खर तर तुम्हांला साहित्य वाचून अस वाटेल कि हे तर डोश्याच साहित्य आहे. अगदी बरोबर पण याची करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळेच ते डोश्यापेक्षा वेगळे लागतात. आंबोळी डोश्याप्रमाणे पातळ व क्रिस्पी नसते तर जाडसर आणि मऊ असते. आंबोळीला छान जाळी पडते.
आंबोळीचे पीठ :
- भाकरीचे जाडे तांदूळ- ५०० ग्रॅम
- उडीद डाळ- ५० ग्रॅम
- मेथी दाणे- १/२ टीस्पून
गिरणीतून जाडसर/रवाळ/खसखशीत दळून आणावे.
- आंबोळीचे पीठ- १ कप
- मीठ- चवीनुसार
- पाणी- अंदाजे १+ १/४ कप (थोडस कमी-जास्त, डोश्याच्या मिश्रणाप्रमाणे हव.)
कृती:
- पिठात पाणी मिसळून सरसरीत भिजवावं व सर्व गुठळ्या मोडून घ्याव्यात.
- हे मिश्रण एका डब्यात भरून उबदार जागी रात्रभर ठेऊन द्यावे.
- करतेवेळी मीठ घालून छान ढवळून घ्यावे.
- नॉन-स्टीक तवा किंव्हा बीडाची "कावील" गरम करावी.
- चमच्याने किंव्हा कांदा अर्धा कापून, त्याने तव्याला तेल लावावं. ऑईल स्प्रेचा सुद्धा वापर करता येईल. (माझी आई नारळाच्या शेंबीने कावीलला तेल लावायची.)
- तवा चांगला गरम झाला कि वाटीने किंव्हा पळीने तव्याच्या कडे पासून मध्यापर्यंत हे मिश्रण गोलाकार ओतावे. (सविस्तर कृतीसाठी "घावण" ची कृती वाचावी.)
- झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजू द्यावे. कडा सुटताच उलटे करावे व १-२ मिनिटे शिजू द्यावे.
- आंबोळी तयार……… मटण रस्सा /कोंबडी रस्सा किंव्हा काळे वाटाणे आमटी / चणे आमटी सोबत खा. नारळाच्या चटणीसोबत पण मस्त लागते.
झटपट आंबोळ्या बनवायच्या असतील तर …….
- १/२ कप जाडे तांदुळ, १ टेबलस्पून उडीद डाळ आणि चिमुटभर मेथीदाणे ४-५ तास भिजत घाला आणि वाटा. रात्रभर आंबू द्या.
- १ टेबलस्पून उडीद डाळ आणि चिमुटभर मेथीदाणे २ तास भिजत घाला आणि वाटा. त्यात १/२ कप तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करा. रात्रभर आंबू द्या.
आपल्या कोकणी पध्दतीच्या पाककृतींची वेबसाईट काढून तुम्ही जो मानसिक आनंद दिला आहे त्याबद्दल तुमची अत्यंत आभारी आहे. आणखीही अशा आपल्या कोकणातील (रत्नागिरीतल्या) पाककृती सतत येऊ देत रहा.
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteचव कोकणाची आपल्या मातीची