"कोंबडी-वडे" या लोकप्रीय पदार्थातील "कोंबडी" म्हणजे कोंबडीचा रस्सा आणि वडे. तर मग पाहूया सर्वांचा आवडता असा झणझणीत, रुचकर  कोंबडीचा रस्सा. नुसते वडेच नाही तर भात, भाकरी, चपाती, घावण, आंबोळी किंव्हा पाव कश्याही सोबत हा रस्सा चांगला लागतो ……. नक्की करून पहा !
  
साहित्य:
- गावठी कोंबडी - १/२ किलो (ब्रोइलर चिकन पण चालेल)
 - कांदा, चिरुन- १/४ कप
 - हळद- १/२ टीस्पून
 - हिंग- १/४ टीस्पून
 - घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला किंवा संडे मसाला - ५ ते ६ टीस्पून (आवडीनूसार कमी जास्त वापरा)
 - तेल- ४ टे.स्पून
 - तमालपत्र- ६
 - मीठ - चवीनुसार
 
हिरवं वाटण-
खोबऱ्याचे वाटण-
कृती:
टीपा :
पाककृती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
वडे : http://marathifoodfunda.blogspot.in/2013/08/blog-post_2.html
आंबोळी :http://marathifoodfunda.blogspot.in/2014/07/kokani-aambolya.html
- आल- २ इंच
 - लसुण- ८ ते १० पाकळ्या
 - हिरवी मिरची- १ ते २
 - कोथिम्बिर- २ टेबलस्पून
 
खोबऱ्याचे वाटण-
- तेल- २ टीस्पून
 - खवलेल ओल खोबर - १/४ कप
 - किसलेले सुक खोबर-१/४ कप
 - कांदा, चिरुन- १/४ कप
 - लवंगा- ३
 - धणे- १/२ टीस्पून
 - बडीशेप- १/४ टीस्पून
 - खसखस- १/४ टीस्पून
 - काळी मिरी- ६
 - जायपत्री- १ छोटी
 - दालचिनी- २ इंचाचा तुकडा
 
कृती:
- चिकन स्वच्छ धुउन आणि कापून घ्या. त्याला हळद, हिंग, मसाला, हिरवं वाटण आणि मीठ लाऊन व्यवस्थित चोळा. कमीतकमी अर्धा ते एक तास मुरत ठेवा.
 - कढई मध्ये तेल गरम करुन त्यात कांदा आणि तमाल पत्र टाका व कांदा गुलाबी होइस तो पर्यंत परता.
 - आता चिकन घालुन चांगले ५ मिनिटे मोठ्या आचेवर खमंग परता.
 - त्यात जरुरीप्रमाणे पाणी घाला. झाकणावर पाणी ठेऊन मध्यम आचेवर १५- २० मिनिटे शिजू द्या.
 - मग वाटण टाकून व्यवस्थित हलून घ्या. ३० ते ४५ मिनिट मंद आचेवर झाकण लाऊन शिजवुन घ्या.
 - मधेमधे हलवत रहा. जरुरीनुसार गरम पाणी टाका. झाकानावरचे टाकले तरी चालेल. चव घेऊन मिठाचे प्रमाण पहा. (पण लक्ष्यात ठेवा, नेहमीच्या चिकनपेक्षा गावठी कोंबडी शिजायला जास्त वेळ लागतो. )
 - गरमागरम रस्सा वडे, आंबोळी किंव्हा भातासोबत वाढा.
 
टीपा :
- रस्सा घट्ट हवा असेल तर खोबऱ्याचे प्रमाण वाढवले तरी चालेल पण त्या प्रमाणात थोडा मसालाही वाढवायला लागेल.
 - नुसते ओले किंव्हा नुसते सुके खोबरे घेतले तरी चालते पण दोन्ही घेतल्यामुळे रस्सा चवीला चांगला लागतो.
 - मालवणी मसाला बाजारात उपलब्द्ध आहे. अगदी आगरी-कोळी मसाला वापरला तरी चालेल. कोकणातले हे मसाले थोड्याफार फरकाने चवीला सारखेच असतात. मात्र घरगुती मसाले पदार्थाला जी चव देतात ते विकतचे मसाले देऊ शकत नाहीत.
 - आमचे मुळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील असल्यामुळे माझा घरगुती मसाला हा मालवणी मासाल्यासारखाच आहे. नक्की वापरून पहा.
 
पाककृती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
वडे : http://marathifoodfunda.blogspot.in/2013/08/blog-post_2.html
आंबोळी :http://marathifoodfunda.blogspot.in/2014/07/kokani-aambolya.html


sundar
ReplyDeletekhup chan
ReplyDelete