Wednesday, April 9, 2014

Goda Masala (गोडा मसाला)

गोडा मसाला हा शाकाहारी पदार्थांमध्ये वापरला जातो. खास अश्या ब्राम्हणी पदार्थांची हा खासियत आहे. आमटी, भरलेली वांगी-तोंडली, मसालेभात, खिचडी, उसळी इत्यादी पदार्थांची चव वाढवतो.



Read this recipe in English........... click here. 


साहित्य:
  • धणे - ५०० ग्रॅम (खासकरून इंदूरी धने वापरावेत)
  • सुके खोबरे- १ वाटी/कवड
  • तीळ - १०० ग्रॅम
  • जिरे- १०० ग्रॅम
  • शहा जिरे - २५ ग्रॅम
  • लवंग- ५ ग्रॅम
  • दालचिनी- ५ ग्रॅम
  • तमाल पत्र- १० ग्रॅम
  • मसाला वेलची- ५ ग्रॅम (ऐच्छिक )
  • दगड फुल - १० ग्रॅम
  • नागकेशर-  ५ ग्रॅम (ऐच्छिक )
  • हिंग- २५ ग्रॅम
  • शेंगदाणा तेल- थोडस जरुरीप्रमाणे


कृती:
  • हे सर्व मसाल्याचे जिन्नस मंद आचेवर वेगवेगळे छान वास येईपर्यंत तेलावर खमंग भाजून घ्यावेत. करपऊ नयेत. 
  • मसाल्याचे जिन्नस तळून झाले कि गरम असतानाच त्यावर हिंग पूड पसरावी. ( जर खडा हिंग वापरायचा असेल तर, आधी तेलात तळून नंतर खलबत्याने कुटून घ्यावा.)
  • तीळ व खोबरे वेगवेगळे भाजून कुटून घ्यावेत आणि मिक्सरवर दळून घ्यावेत. भाजताना तेलाची आवश्यकता नाही.  
  • नंतर थंड झाल्यावर तीळ व खोबरे सोडून इतर सर्व मसाल्याचे जिन्नस मिक्सरवर दळून घ्यावेत. दळून झाल्यावर चाळणीने चाळून पुन्हा मिक्सरवर दळून घ्यावा.  
  • मसाले दळून झाले कि त्यात दळलेले तीळ व खोबरे मिक्स करावे.  
  • मसाला पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात/बरणीत भरून ठेवावा. 
  • सुके खोबरे व तीळ वापरल्यामुळे मसाला खराब होण्याची शक्यता असते. शिवाय मसाल्याला खोमट (खवट ) असा वास येतो म्हणून मसाला फ्रीझमध्ये ठेवावा.        



No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.