दही बुत्ती/दही भात उन्हाळ्यात खाल्ल्यामुळे पोटाला गारवा मिळतो. झटपट होणारा हा भाताचा प्रकार रुचकर आणि पोटभरीचा आहे.
Read this recipe in English......... click here.
साहित्य:
कृती:
सुचना आणि वैविधता :
Read this recipe in English......... click here.
साहित्य:
- तांदूळ- १ कप
- दही- १ १/२ कप (दही शीळे व फार आंबट नको)
- काकडी- १ (ऐच्छिक)
- शेंगदाणे- २ टेबलस्पून (ऐच्छिक)
- तेल- १ टेबलस्पून
- मोहरी- १ टीस्पून
- कढीपत्ता पाने- १ डहाळी
- सुक्या लाल मिरच्या- २ ते ३
- उडीद डाळ- १ टीस्पून
- हिंग- १/४ टीस्पून
- मीठ- चवीनुसार
कृती:
- भात शिजवून घ्यावा. एका ताटात काढून पसरावा म्हणजे लवकर थंड होईल.
- भात थंड झाला की त्यात दही आणि मीठ घाला. ढवळून एकत्र करून घ्या.
- काकडीचे छोटे तुकडे करून घ्या.
- कढल्यात तेल गरम करून शेंगदाणे तळून घ्यावेत. हे शेंगदाणे व काकडीचे तुकडे दही घातलेल्या भातावर पसरावेत.
- त्याच गरम तेलात उडीद डाळ घालावी. गुलाबीसर झाली की त्यात कढीपत्ता, सुक्या मिरच्या तोडून घालाव्यात. सगळ्यात शेवटी हिंग घालून गॅस बंद करावा आणि हि फोडणी दही-भातावर घालावी.
- छान एकत्र करून वाढावे.
सुचना आणि वैविधता :
- भात गरम असताना भातात दही मिसळू नये.
- तुम्हाला भात जर मऊ व गुरगुट्या आवडत असेल तर त्यात १/४ कप थंड दुध घालावे.
- भात अजून चटपटीत बनवायचा असेल तर भातात बारीक किसलेले आले मिसळावे.
- कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, जीरे असे एकत्र वाटून दह्यात फेटावे आणि भातात घालावे, छान चव येते.
- सुक्या मिरच्यांऐवजी सांडगी मिरच्या (भरून सुकवलेल्या) फोडणीत टाकाव्यात. भात खाताना वरून कुस्करून टाकाव्यात, भाताला छान खमंगपणा येतो.
- काकडी ऐवजी किंव्हा सोबत काळी/हिरवी द्राक्षे किंव्हा डाळिंबाचे दाणे भातात टाकावेत. पांढरा कांदा पण चिरून घालता येईल. पण मग अशी फळे किंव्हा भाज्या घातलेला भात लगेचच संपवावा. अन्यथा भाताला पाणी सुटेल व कडवटपणा येईल.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.