चटकदार आणि चमचमीत ………
साहित्य:
- भावनगरी किंव्हा मोठ्या मिरच्या- ८ ते १० (नेहमीच्या मिरच्या पण चालतील, त्यातल्या त्यात मोठ्या आणि जाड शोधून घ्याव्यात. पण त्या फार तिखट लागतील. )
- खवलेले ओले खोबरे- १ कप (अंदाजे अर्धा नारळ)
- मोहरी- १ टेबलस्पून
- तीळ - १ टेबलस्पून
- मेथीदाणे- ४ ते ६ दाणे
- लिंबाचा रस- २ टेबलस्पून
- हळद- १ टीस्पून
- हिंग- १/४ टीस्पून
- साखर- १/२ टीस्पून
- मीठ चवीनुसार
- तेल- आवश्यकतेनुसार
कृती:
- मिरच्या धुऊन पुसून घ्याव्यात. मिरच्याना मधोमध उभी चीर द्यावी. आतून-बाहेरून थोडे मीठ चोळून १०-१५ मिनिटे ठेऊन द्याव्यात. (त्यामुळे मिरच्या मऊ होतात आणि भरताना तुटत नाहीत. शिवाय लवकर शिजतात आणि बाहेरून पचक्या लागत नाहीत.)
- मंद अग्नीवर मोहरी, तीळ आणि मेथीदाणे छान खमंग भाजून घ्या. खलबत्याने कुटून घ्या किंव्हा मिक्सरमध्ये भरड वाटा. एका बाउल मध्ये ओलं खोबर, कुटलेला मसाला, हळद, लिंबाचा रस, साखर आणि मीठ हे सर्व एकत्र करून हाताने चुरून कालवा.
- वरील सारण सर्व मिरच्यात भरा.
- एका पसरट नॉन-स्टीक पँन मध्ये थोडेसे तेल गरम करून मंद अग्नीवर मिरच्या दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर खमंग परताव्यात.
Yat apan paneer,cheese,dane kut,soya chunks cha saran ,chikan mutton cha kheema pn ghalu shakto na
ReplyDelete