या घावण्याला धिरडे असेही म्हणतात. माझं बालपण मुरुड सारख्या एका गावात गेले. फारस बाहेरचं खायला मिळायचं नाही. आजच्या सारखे बिस्कीट, फरसाण वै. सारख्या पदार्थांनी डबे भरलेले नसायचे. खेळून आलो किंव्हा शाळेतून आल्यावर आई पटकन काहीतरी गरम गरम खायला करायची त्या पैकीच हा एक पदार्थ आहे. खरतरं न्याहारीचा हा पदार्थ पण केव्हाही खाता येण्यासारखा.
Read this recipe in English......click here.
साहित्य:
तांदुळाचे पीठ- १ कप (पीठ मध्यम असावे, फार बारीक दळू नये )
आंबट ताक- १/२ कप
पाणी- ३/४ कप (थोडेफार कमी-जास्त पाणी लागेल, सरसरीत असावे)
लसुण पाकळ्या - ३ ते ४
लसुण पाकळ्या - ३ ते ४
जीरे- १ टीस्पून
हिरव्या मिरच्या- २
मेथी पूड- चिमुटभर (ऐच्छिक)
मेथी पूड- चिमुटभर (ऐच्छिक)
मीठ- चवीनुसार
तेल- आवश्यकतेनुसार
कृती:
मिरच्या, लसुण आणि जीरे खडबडीत वाटून घ्यावी. फार तिखट आवडत नसेल तर मिरची न वाटता त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. म्हणजे सहज बाजूला काढता येतील.
पीठ, लसून-मिरचीचा ठेचा, ताक, जरुरीनुसार पाणी आणि मीठ एकत्र करून छान ढवळून घ्यावे.
सर्व गुठळ्या मोडून काढाव्यात.
नॉन-स्टीक डोसा तवा किंव्हा बीडाची कावील गरम करून त्यावर थोडेसे तेल पसरून घ्यावे. वाटीभर मिश्रण घेऊन तव्याच्या कडेपासून मध्यापर्यंत ओतावे. कडेने थोडेसे तेल सोडावे.
झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजवावे. नंतर उलटून पुन्हा १-२ मिनिटे भाजावे.
गरम गरम टोमाटो केचप सोबत वाढावे अथवा नुसतेच खावे.
I love this dish! My grand mom makes Ghavas whenever we visit her.
ReplyDeleteChan
ReplyDeleteखूप छान,
ReplyDelete