Read this recipe in English.......
साहित्य:
आलं- १ इंचाचा तुकडा
ओल्या लाल मिरच्या- १०
लसुण पाकळ्या - १०
कांदा - १ मोठा
तेल- ४ टेबलस्पून
लिंबाचा रस - ४ टेबलस्पून
साखर - २ टीस्पून
मीठ - २ टीस्पून किंव्हा चवीप्रमाणे
कृती:
आलं व कांदा सोलून त्याचे तुकडे करा.लसुन सोला. मिक्सर मध्ये त्याची पाणी न घालता पेस्ट बनवा. जरुरी वाटल्यास थोडे तेल घाला.
तेल पँन मध्ये गरम करून त्यात तयार पेस्ट टाकून परतून घ्या. तेल सुटेपर्यंत परता. नंतर त्यात लिंबाचा रस, साखर आणि मीठ घाला. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून अजून २ मिनिटे परतावा. एका बाउल मध्ये काढून घ्या.
सांबल फ्रीजमध्ये २-३ आठवडे आणि फ्रिझरमध्ये २-३ महिने टिकू शकते.
सांबल फ्रीजमध्ये २-३ आठवडे आणि फ्रिझरमध्ये २-३ महिने टिकू शकते.
सांबल तळलेले टोफू, पनीर, बटाटे व इतर भाज्या इत्यादी सोबत तसेच फ्राईड राईस, उकडलेले अंडे, ग्रील्ल्ड किंव्हा उकडलेले मांस, मासे इत्यादी सोबत चटणी किंव्हा सॉस प्रमाणे खाउ शकता.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.