भाजणीचे वडे अतिशय रुचकर लागतात. विशेषतः मंगळागौरीच्या नैवेद्याला करण्याची प्रथा आहे.
Read recipein English.........click here.
साहित्य:
कृती:
टिपा:
Read recipein English.........click here.
साहित्य:
- थालीपिठाची भाजणी- १ कप
- कोथिंबीर, बारीक चिरून- मूठभर
- तीळ- १ टेबलस्पून
- मिरची पूड- १ टिस्पून
- हिंग- १/४ टिस्पून
- हळद- १/२ टिस्पून
- ओवा- १ टिस्पून (ऐच्छिक)
- मीठ- चवीनुसार
- गरम तेल (मोहन) - १ टेबलस्पून
- कोमट पाणी- साधारण ३/४ कप
- तेल,तळण्यासाठी- आवश्यकतेनुसार
कृती:
- परातीत भाजणी, मिरची पूड, हळद, हिंग, तिळ, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ एकत्र करा.
- त्यावर मोहन ओता आणि चमच्याने एकत्र करा.
- थोड थंड झाल्यावर कोमट पाणी घालून घट्ट मळुन घ्यावी आणि किमान १५ मिनिटे झाकून ठेवावी.
- तळण्यासाठी कढईत तेल गरम करत ठेवा.
- भिजवलेली भाजणी पुन्हा चांगली मळुन त्याचे १० ते १२ छोटे गोळे करावे.
- प्लॅस्टिकच्या कागदाला पाण्याचा हात लावून १ गोळा पुरी एवढ्या आकाराचा थापावा. मध्ये भोक पाडावे.
- गरम तेलात मध्यम आचेवर खरपूस तळावा. अश्याप्रकारे सर्व वडे करून घ्यावेत.
- गरमगरम वडे दह्याबरोबर सर्व्ह करा.
टिपा:
- भाजणी करताना धान्य व्यवस्थित भाजलेले नसेल तर, वडा खरपुस होत नाही.
- वडे तळताना तुटत असतील तर, त्यात गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ घाला आणि त्यानुसार तिखट-मीठाचे प्रमाण वाढवा.
- भोक पाडले नाही तर वडे पुरीसारखे फुगतात आणि नंतर मऊ पडतात.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.