रायते विशेषत: पुलाव किंवा बिरयानी सोबत दिले जाते. पण हे असे रायते आहे की पुलाव, खिचडी सोबत चांगले लागेलच पण चपाती सोबत पण छान लागते.
Read this recipe in English......click here.
साहित्य:
कृती:
Read this recipe in English......click here.
साहित्य:
- भेंडी - २०० ग्रॅम
- दही - १ कप
- तेल- २ टेबलस्पून
- तयार कैरी लोणचे मसाला - ३ टिस्पून
- मोहरी/राई - १ टिस्पून
- सुक्या लाल मिरच्या- २ नग
- हळद - १/४ टीस्पून
- कढीपत्ता- ६ पाने
- कोथिंबीर, बारीक चिरून - १/४ कप
- साखर - १/२ टिस्पून किंवा चवीनुसार
- मीठ- चवीनुसार
कृती:
- भेंडी स्वच्छ धुवा. किचन टॉवेलने घासून घासून पूर्ण कोरड्या करा.
- भेंडीला मधोमध कापून तिचे लांबट तुकडे करा.
- कढईत १ टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात कापलेली भेंडी टाकून मोठ्या आचेवर २ मिनीट परतून घ्यावे.
- मग आच कमी करून त्यात मीठ आणि लोणचे मसाला घाला. थोडावेळ परतून घ्या. गॅस बंद करून थंड होऊ द्या.
- एका वाडग्यामध्ये दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर आणि मीठ घेऊन छान एकत्र करा.
- कढल्यात १ टेबलस्पून तेल गरम करून मोहरी टाकावी. ती तडतडली की कढीपत्ता, लाल मिरची, हिंग, हळद टाकावे आणि जरासे परतून गॅस लगेच बंद करावा.
- हि फोडणी दह्यात घालून चांगले मिक्स करावे.
- वाढण्यापूर्वी दही आणि भेंडी एकत्र करावे.
- बिरयानी/ पुलाव किंवा चपाती सोबत सर्व्ह करावे.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.