पालक खिचडी रात्रीच्या जेवणासाठी अगदी योग्य पर्याय आहे. बनवायला सोप्पी, पचायला हलकी आणि चवीला अप्रतिम…
Read this recipe in English.......click here.
साहित्य:
कृती:
टीप: पालका ऐवजी मेथी वापरू शकता.
Read this recipe in English.......click here.
साहित्य:
- तांदूळ - १ कप (बासमती घेण्याची गरज नाही, रोजच्या वापरातला किंव्हा कोलम तांदूळ वापरावा)
- मुगडाळ- १/२ कप
- शेंगदाणे- १/४ कप (आवडत असल्यास अजून जास्त वापरा)
- पालक, चिरून- ३ कप (१ छोटी गड्डी/जुडी)
- कांदा, चिरून- ३/४ कप (१ मोठा)
- टोमॅटो, चिरून- १/२ कप (१ मध्यम)
- लसूण, ठेचुन किंवा बारीक चिरून- ६ पाकळ्या
- राई/ मोहरी- १/२ टीस्पून
- जीरे- १/२ टीस्पून
- हिंग- १/४ टीस्पून
- हळद- १/२ टीस्पून
- घरगुती मसाला / मिरची पूड- २ टीस्पून
- गोडा मसाला- २ टीस्पून
- तेल- ३ टेबलस्पून
- गरम पाणी- अंदाजे २ १/२ ते ३ कप (तांदूळ नवा आहे कि जुना यावर अवलंबुन आहे.)
- मीठ- चवीनुसार
- खवलेले ओले खोबरे- १/२ कप
- साजूक तूप- जरुरीनुसार (एच्छिक)
कृती:
- किमान १ तास शेंगदाणे पाण्यात भिजत घाला.
- पालक निवडुन धुवून आणि चिरून घ्या. कोवळी देठे घ्या.
- तांदूळ व मूगडाळ धुवून आणि बाजूला ठेवा.
- कुकरमध्ये तेल गरम करा. राई टाका.
- राई तडतडली की जिरे, लसूण आणि कांदा घालून परता.
- कांदा गुलाबी झाल्यावर हळद, हिंग, तिखट घाला आणि थोडावेळ परता.
- आता टोमॅटो, पालक, शेंगदाणे आणि गोड मसाला घालून एक मिनीट परतून घ्या.
- तांदूळ आणि डाळ घालून जरास परता.
- नंतर पाणी आणि मीठ घाला. झाकण लावून ३ शिट्ट्या काढा.
- वाफ गेल्यावर कुकर उघडा आणि व्यवस्थित मिक्स करा.
- वाढताना भातावर साजूक तूप आणि ओले खोबरे टाकून कोशिंबीर व पापडाबरोबर सर्व्ह करा.
टीप: पालका ऐवजी मेथी वापरू शकता.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.