दिंडे किंवा दिंडा या नावाने हि रानभाजी रायगड जिल्ह्यात ओळखली जाते.  इतर भागात या भाजीची नावे वेगळी असू शकतात.
हि भाजी म्हणजे पावसात उगवणाऱ्या एका वनस्पतीची देठ असतात. यातही दोन प्रकार येतात. काही दिंड्यांची देठ हिरवी तर काहींची लाल असतात.
हि भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. इतर पावसाळी भाज्यांप्रमाणे हि चविष्ट असते. हि भाजी शाकाहारी व मांसाहारी ह्या दोन्ही प्रकारात करता येते.
Read this recipe in English.......click here.
# पध्दत १ (वाल घालून)
साहित्य:
# पध्दत २ (डाळ घालून)

| सौजन्य: प्राजक्ता म्हात्रे | 
# पध्दत १ (वाल घालून)
साहित्य:
- दिंडे - १ जुडी (साधारणपणे ५ देठ )
 - मोड आणून सोललेले वाल- १/२ कप
 - चिरलेला कांदा- १/२ कप
 - ठेचलेल्या लसूण पाकळ्या - ६
 - राई/ मोहरी- १ टीस्पून
 - जिरे- १/२ टीस्पून
 - हिंग- १/४ टीस्पून
 - हळद- १/२ टीस्पून
 - घरगुती मसाला - २ टीस्पून (किंव्हा मिरची पूड- १ टीस्पून+गोडा मसाला- १ टीस्पून)
 - गूळ- १/४ टीस्पून
 - कोकम/आमसूल- २
 - मीठ चवीनुसार
 - तेल- ३ टेबलस्पून
 - बारीक चिरलेली कोथिंबीर- २ टेबलस्पून
 - खवलेले ओले खोबरे- २ टेबलस्पून
 
- दिंड्याची देठ शेवग्याच्या शेंगांप्रमाणे आतील मऊ, पांढरा भाग दिसेपर्यंत सोला. काही दोरे असतील तर काढून टाका.
 - नंतर चिरून व धुऊन घ्या. साधारणपणे १ १/४ कप एवढी भाजी मिळेल.
 - एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली कि जिरे, लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता.
 - त्यात सोललेले वाल व थोडे पाणी टाका. झाकण ठेऊन मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजू द्या.
 - नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
 - त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १० ते १५ मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या.
 - नंतर गुळ, कोकम, कोथिंबीर व ओलं खोबर टाकून एक वाफ काढा.
 - वरून कोथिंबीर व ओलं खोबर पेरा. गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.
 
# पध्दत २ (डाळ घालून)
साहित्य:
- दिंडे - १ जुडी (साधारणपणे ५ देठ )
 - चणा डाळ - २ टेबलस्पून
 - चिरलेला कांदा- २ कप
 - ठेचलेला लसूण पाकळ्या - ७ ते ८
 - राई/ मोहरी- १ टीस्पून
 - हिंग- १/४ टीस्पून
 - हळद- १/२ टीस्पून
 - घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला - २ टीस्पून (किंव्हा मिरची पूड- १ टीस्पून+ गरम मसाला- १ टीस्पून)
 - मीठ चवीनुसार
 - तेल- ३ टेबलस्पून
 - बारीक चिरलेली कोथिंबीर- २ टेबलस्पून
 
कृती:
- चणा डाळ धुवून २ तास भिजत ठेवा.
 - दिंड्याची देठ शेवग्याच्या शेंगांप्रमाणे आतील मऊ, पांढरा भाग दिसेपर्यंत सोला. काही दोरे असतील तर काढून टाका.
 - नंतर चिरून व धुऊन घ्या. साधारणपणे १ १/४ कप एवढी भाजी मिळेल.
 - एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली कि लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता.
 - त्यात भिजलेली डाळ व थोडे पाणी टाका. झाकण ठेऊन मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजू द्या.
 - नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
 - त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १० ते १५ मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या.
 - वरून कोथिंबीर पेरा. गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.
 
# पध्दत ३ (कोलंबी  घालून)
साहित्य:
- दिंडे - १ जुडी (साधारणपणे ५ देठ )
 - सोललेली कोलंबी - १/२ कप
 - चिरलेला कांदा- १/२ कप
 - आले-लसूण पेस्ट- २ टीस्पून
 - हिंग- १/४ टीस्पून
 - हळद- १/२ टीस्पून
 - घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- २ टीस्पून
 - कोकम/आमसूल- ३
 - मीठ चवीनुसार
 - तेल- ३ टेबलस्पून
 - बारीक चिरलेली कोथिंबीर- २ टेबलस्पून
 
- कोलंबी सोलून त्यातील मधला काळा दोरा काढा व धुवून घ्या. कोलंबीला आल-लसुन पेस्ट, हळद व मीठ चोळून १ तास मुरत ठेवा.
 - दिंड्याची देठ शेवग्याच्या शेंगांप्रमाणे आतील मऊ, पांढरा भाग दिसेपर्यंत सोला. काही दोरे असतील तर काढून टाका.
 - नंतर चिरून व धुऊन घ्या. साधारणपणे १ १/४ कप एवढी भाजी मिळेल.
 - एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता.
 - नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
 - त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १० ते १२ मिनिटे शिजू द्या.
 - त्यात कोलंबी टाकुन मिक्स करा. झाकण ठेऊन मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजू द्या.
 - वरून कोथिंबीर पेरा. गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.
 
ही भाजी खाताना त्यातील फक्त गरच न खाता (शेवग्याच्या शेंगांसारखा) भाजीचा सर्वच भाग खायचा का?
ReplyDeleteह्या भाजीची साले आधीच पूर्णपणे काढून अळूच्या देठाप्रमाणे भाजीसाठी फक्त त्याचा आतील गाभा वापरला आहे. त्यामुळे शेवग्याच्या शेंगासारखी खाताना साले काढून टाकण्याचा प्रश्नच येत नाही. या शेंगा नाहीत, हि भाजी देठ आहेत.
Delete