घरी बनवलेले चिकन पॉपकॉर्न्स हे केएफसी पेक्षा जास्त चविष्ट लागतात आणि स्वस्तही. करायला सोप्पे आहेत मग करून पाहणार नं ?
साहित्य:
- बोनलेस चिकन- २५० ग्रॅम
- कॉर्न फ़्लोवर- १ टीस्पून
- अंड - १
- लसूण पावडर- १/२ टिस्पून किंवा लसूण पेस्ट- १ टीस्पून
- कांदा पावडर- १/२ टिस्पून किंवा कांदा पेस्ट- १ टीस्पून
- मिरची पावडर- २ टिस्पून किव्हा आवडीनुसार
- मिक्स हर्ब्स- १/२ टिस्पून
- मिरपूड- १ टीस्पून किंवा चवीनुसार
- Worcestershire सॉस किंवा लिंबाचा रस- १ टिस्पून
- मीठ- चवीनुसार
- मक्याचे पोहे (चिवड्यासाठी वापरतात ते), भरड चुरा करून - २ कप
- तळण्यासाठी तेल- आवश्यकतेनुसार
कृती:
- चिकन धुवून त्याचे छोट्या आकाराचे तुकडे करा.
- एक वाडग्यात लसूण व कांदा पावडर, मिरची पावडर, मिक्स हर्ब्स , मिरपूड, Worcestershire सॉस आणि मीठ एकत्र करा.
- मिश्रण चांगले मिक्स करून त्यात चिकनचे तुकडे घालावे. चिकनच्या तुकड्यांना मिश्रण व्यवथित चोळावे आणि किमान २ तास चिकन मुरु द्यावे.
- नंतर त्यात अंड्याचा पांढरा भाग व कॉर्न फ्लोअर घालावे. सर्व काही चांगले मिक्स करावे.
- एका कढईत तेल गरम करायला ठेवा.
- एका डिशमध्ये मक्याच्या पोह्यांचा चुरा घ्या. एकएक चिकन तुकडा त्यात घोळवा. बाजूने तो चुरा चिकनला चिकटला पाहिजे.
- अश्या प्रकारे सर्व चिकनचे तुकडे सोनेरी-तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावेत. टिशू पेपरवर काढावेत.
- गरमागरम चिकन पॉपकॉर्न्स टोमॅटो केचप आणि सलाड सोबत सर्व्ह करावे.
टिपा:
- मक्याच्या पोह्यांचा चुऱ्याच्याऐवजी ब्रेडक्रम्ब्स किंवा कॉर्न फ्लेक्सचा चुरा वापरू शकता.
- हेच चिकन पॉपकॉर्न्स भारतीय चवीत बनवायचे असतील तर वर नमूद केलेले मसाले वापरण्याऐवजी टिक्का मसाला, आलं-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस घाला.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.