चटपटीत, पटकन होणारी बेबी कॉर्नची भाजी………
साहित्य:
- बेबी कॉर्न, चकत्या कापून - १ कप
- सिमला मिरची, चौकोनी कापून- १ कप
- कांदा, बारीक चिरून- १ कप
- टोमॅटो, बारीक चिरून- १/२ कप
- हिरव्या मिरच्या, बारीक चिरून किंवा ठेचून- २ टिस्पून
- आले लसूण पेस्ट- २ टिस्पून
- हळद- १/२ टिस्पून
- हिंग- चिमुटभर
- कढाई मसाला किंवा पंजाबी गरम मसाला- १/२ टिस्पून
- कोथिंबीर, बारीक चिरून- १/४ कप
- तेल- ४ ते ६ टेबलस्पून
- मीठ- चवीनुसार
कृती:
- बेबी कॉर्न धुवून कापून घ्या आणि ब्लांच करा (उकळत्या पाण्यात टाकून फक्त १-२ मिनिटे शिजवा व निथळत ठेवा.)
- एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मिरची आणि कांदा घाला. कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
- त्यात हळद, हिंग, आले- लसूण पेस्ट, टोमॅटो आणि मीठ घाला. २-३ मिनिटे परतून घ्या.
- बेबी कॉर्न घालून चांगले मिक्स करा. झाकण ठेवून २ मिनिटे शिजवा.
- शिमला मिरची आणि गरम मसाला घालून चांगले मिक्स करा. झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजवा.
- वरून कोथंबीर घालून गरमागरम चपाती सोबत गरमागरम सर्व्ह करा.
बेबी कोर्न ऐवजी कोळंबी वापरून पण हि भाजी करता येईल.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.