सोड्याची खिचडी किंव्हा सोडे भात कोकणात अतिशय लोकप्रिय आहे. सी. के. पी. लोकांची तर यात खासियत आहे.
Read this recipe in English.... click here.
वाढणी: ४
साहित्य:
कृती:
टीप:
सोडे म्हणजे उन्हात सुकवलेली कोलंबी. कोकणात अनेक पदार्थात सोडे वापरले जातात. अधिक माहितीसाठी "सुकी मासळी" इथे क्लिक करा.
Read this recipe in English.... click here.
वाढणी: ४
साहित्य:
- सोडे - १/२ कप
- तेल- ४ ते ६ टेबलस्पून
- तांदूळ - २ कप (बासमती तांदूळ वापरण्याची गरज नाही, मी कोलम तांदूळ वापरते. )
- कांदा, उभा चिरून- २ कप
- टोमॅटो, बारीक चिरून- १ कप
- बटाटा- १ मोठा
- दालचिनी- १ इंचाचा तुकडा
- तमालपत्र- ३
- आले-लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
- हळद - १/२ टिस्पून
- हिंग- १/२ टिस्पून
- घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- ४ ते ५ टिस्पून
- ओल्या नारळाचे वाटण- २ टेबल स्पून (नाही वापरले तरी चालेल)
- मीठ- चवीनुसार
- पाणी - ४ कप (तांदूळ जुना आहे की नवा यावर अवलंबून असते)
- अंडी, उकडलेली - २
- कोथिंबीर, बारीक चिरून - मुठभर
कृती:
- सोड्याचे हातानेच तोडून लहान तुकडे करा.
- व्यवस्थित धुवून आणि १५ मिनीटे पाण्यात भिजवा आणि नंतर घट्ट पिळून घ्या.
- तांदूळ धुवून बाजूला निथळत ठेवा.
- बटाटा सोलुन त्याचे साधारण १ इंच लांबीचे तुकडे करा.
- एका छोट्या कुकर मध्ये तेल गरम करावे. त्यात तमालपत्र, दालचिनी आणि कांदा घालावा.
- कांदा गुलाबी रंगावर परतला गेला की त्यात हळद, हिंग, मसाला टाकून जरास परता. त्यात आले-लसूण पेस्ट घालून पुन्हा परता आणि भिजवून पिळुन घेतलेले सोडे घालून १ मिनिट परता.
- नंतर त्यात वाटण घालून तेल सुटेपर्यंत परता.
- आता टोमॅटो, बटाटा घाला आणि २ मिनिटे चांगले परता.
- नंतर तांदूळ घालून एक मिनिटभर परता.
- पाणी आणि मीठ घाला. (नुसतेच पाणी वापरण्याऐवजी अर्धे पाणी आणि अर्धे नारळाचे दुध वापरले तर अजून मस्त चव येते.) चांगले मिक्स करावे आणि झाकण लावून कुकर बंद करा. ३ ते ४ शिट्ट्या घ्या. (कुकरच्या बाहेरही करता येईल, गरम पाणी वापरलेत तर भात चांगला मोकळा व लवकर शिजेल. साधारण भात शिजायला १५ ते ते २० मिनिटे लागतील.)
- वाढताना वरून चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. कोशिंबीर आणि उकडलेल्या अंड्यासोबत गरमागरम सर्व्ह करा. सोबत सोलकढी उत्तम लागते.
टीप:
सोडे म्हणजे उन्हात सुकवलेली कोलंबी. कोकणात अनेक पदार्थात सोडे वापरले जातात. अधिक माहितीसाठी "सुकी मासळी" इथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.