ज्या कालवणाच्या वासाने भूक चाळवते, रंगाने डोळे आसुसतात आणि चवीने जिव्हा तृप्त होते असे हे खेकडा किंवा चिंबोरीचे कालवण!
Read this recipe in English.......click here.
साहित्य:
- खेकडे/चिंबोर्या/कुर्ल्या - ६
 - कांदा, बारीक चिरुन- १ मध्यम
 - हिंग- १/४ टीस्पून
 - हळद- १/२ टीस्पून
 - घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला- २ ते ३ टीस्पून
 - तेल- ३ ते ४ टेबलस्पून
 - मीठ- चवीप्रमाणे
 
- आले- १/२ इंच
 - लसूण पाकळ्या- ६
 - कोथिंबीर- मुठभर
 - हिरव्या मिरच्या- १
 
कांदा-खोबऱ्याचे वाटण 
- कांदा, उभा चिरुन- १ मध्यम
 - किसलेले सुके खोबरे- १ खोबऱ्याची वाटी/कवड
 - काळे मिरे- ४
 - लवंगा- २
 - दालचिनी- २ इंचाचा तुकडा
 - बडिशोप- १ टीस्पून
 - धणे- २ टीस्पून
 
कृती:
- चिबोर्यांच्या मोठ्या नांग्या आणि बारीक पाय काळ्जीपूर्वक काढून घ्याव्या. चिंबोर्या साफ करून स्वच्छ धुवाव्या.
 - हिरवे वाटण करून मोठे नांगे आणि चिबोरीला चोळावे. हिंग, हळ्द, मीठ व मसाला ही चोळावा.
 - बारीक पाय मिक्सर मधून काढून त्याचा रस बारीक चाळणीने गाळून घ्यावा. या रसामुळे कालवणाला चव येते. (पण हे जर फारच अवघड वाटत असेल तर नाही केल तरी चालेल. )
 - उभा चिरलेला कांदा तव्यावर थोड्या तेलावर तपकिरी रंगावर तळून घ्यावा. चांगला परतला की बाजूला काढून सुके खोबरे भाजून घ्यावे. ते तांबुस झाले की धणे, बडिशोप, लवंग, दालचिनी, मिरे परतून घ्यावे. सर्व एकत्र वाटून बाजुला ठेवावे.
 - आता मोठ्या पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदा टाकावा.
 - कांदा परतावा व तपकिरी झाला की खोबऱ्याचे वाटण घालावे व मसाला लावलेल्या चिंबोर्या घालून चांगले परतावे.
 - बाजूला ठेवलेला पायाचा रस घालावा. थोडे पाणी घालून चिंबोर्या शि़जवाव्या. शि़जल्या की लाल होतात.
 - ज्या प्रमाणात रस्सा हवा असेल त्या प्रमाणात पाणी घालावे. साधारण १५ मिनिटे मंद आचेवर चांगली उकळावे.
 - आणि ……… आणि काय गरम गरम भातासोबत कालवण ओरपावे.
 

छान
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteपूष्कळ , छान माहीती आहे . रेसीपी ऊत्तम .
ReplyDeleteखुप छान सुंदर रेसिपी सुरमई ,करली ऊत्तम .
ReplyDeleteपूष्कळ , छान माहीती आहे . रेसीपी ऊत्तम .
ReplyDelete