हिवाळा म्हणजे भाज्यांची रेलचेल. फेब्रुवारीत शेवग्याच्या शेंगा येऊ लागतात. वालाचे दाणे, वांगी, बटाटा आणि शेंगा अशी हि मिक्स रस्सा भाजी एकदम मस्त लागते.
Read this recipe in English...... click here.
साहित्य:
Read this recipe in English...... click here.
साहित्य:
- ताजे वालाचे किंवा पावट्याचे दाणे- साधारण २ कप (५०० ग्रॅम शेंगांपासून)
- वांगे - १ मध्यम आकाराचे किंव्हा ३ छोटी वांगी
- बटाटा- १ मध्यम
- शेवग्याच्या/शेकटाच्या शेंगा - ४ ते ५
- कांदा, बारीक चिरून- १ मध्यम
- लसूण, ठेचुन- ५ ते ६ पाकळ्या
- घरगुती मसाला किंवा कोल्हापुरी मसाला किंव्हा लाल मिरची पावडर- ३ ते ४ टीस्पून
- मोहरी- १ टिस्पून
- हळद - १/२ टिस्पून
- हिंग- १/४ टिस्पून
- जिरे- १ टिस्पून
- गोडा मसाला- २ टिस्पून
- गूळ- १/२ टिस्पून (ऐच्छिक )
- मीठ- चवीनुसार
- तेल- २ ते ३ टेबलस्पून
- कोथिंबीर, बारीक चिरून- २ टेबलस्पून
- भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- ३ ते ४ टेबलस्पून
- पाणी- आवश्यकतेनुसार
- शेवग्याच्या शेंगाचे ३-४ इंचाचे तुकडे करून सोला. बटाटे सोला आणि १ इंचाचे तुकडे करा. वांग्याचे साधारण१.५ इंचाचे तुकडे करा. सर्व भाज्या धुवून घ्या.
- मोठ्या पॅनमध्ये किंवा पातेल्यात तेल तापत ठेवावे. राई, लसूण, जिरे टाकून फोडणी करावी. त्यात कांदा टाकून सोनेरी रंग येईपर्यंत परतावा.
- नंतर हिंग, हळद आणि मसाला टाकून परतावे. त्यात खोबऱ्याचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
- वालाचे दाणे आणि थोडे पाणी घालावे. झाकण ठेवून ५-६ मिनीटे शिजवावे.
- नंतर त्यात शेंगा, वांगी, बटाटे, मीठ व गोडा मसाला टाकावा. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालावे व छान मिक्स करावे.
- भाजी शिजली कि त्यात गुळ घालावा. (आवडत असल्यास कच्चे/हिरवे टोमॅटो किंव्हा लाल टोमॅटो घालू शकता. कच्च्या टोमॅटोला लाल टोमॅटो पेक्षा शिजायला वेळ लागतो.)
- चांगले मिक्स करावे आणि ३-४ मिनिटे शिजवावे.
- सर्व भाज्या निट शिजल्यावर गॅस बंद करून भाजीत कोथिंबीर घालावी.
- हि भाजी कुकरला पण शिजू शकता.
- पोळी किंवा भाकरीबरोबर गरमगरम सर्व्ह करावी.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.