कोळंबीचे लिपते म्हणजे अंगाबरोबर रस असलेले कालवण जे चपाती किंवा भाकरीसोबत खाता येईल.
Read this recipe in English.....click here.
साहित्य:
कृती:
Read this recipe in English.....click here.
साहित्य:
- कोळंबी, सोललेली- १/२ ते ३/४ कप
- कांदा, बारीक चिरून- २ मध्यम (साधारण १ कप)
- टोमॅटो, बारीक चिरून- २ (साधारण १ कप)
- हिरव्या मिरच्या- २
- हळद- १/२ टिस्पून
- हिंग- १/४ टीस्पून
- घरगुती मिक्स मसाला किंवा मालवणी मसाला किंवा सनडे मसाला- २ टिस्पून
- आले~लसूण पेस्ट- २ टेबलस्पून
- कोकम / आमसुल- २
- तेल- ४ टेबलस्पून
- मीठ- चवीनुसार
- कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर
कृती:
- कोळंबी सोलून, मधला दोर काढून स्वच्छ धुवून घ्यावी. (मी इथे मध्यम आकाराची कोळंबी वापरली आहे परंतु लहान कोळंबी अधिक चविष्ट लागते.
- कोळंबीला मीठ, हळद, मसाला आणि आले-लसूण पेस्ट लावून किमान अर्धा तास मुरत ठेवावे.
- कढईत तेल गरम करून कांदा घाला. कांदा गुलाबी होईपर्यंत परतल्यावर त्यात हिंग घालून जरासं परता.
- त्यात मिरची, टोमॅटो आणि थोडे मीठ घालावे. मिरच्या देठ काढून अख्ख्याच घालाव्यात. छान परतून घ्यावेत.
- टोमॅटो परतून मऊ होतील आणि मसाल्याला तेल सुटू लागले की त्यात कोळंबी टाका आणि जरासं परता. त्यावर थोडे पाणी शिंपडा आणि चांगले मिक्स करा.
- कोकम आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. झाकण ठेवून ६ ते ८ मिनिटे शिजू द्यावे. मध्ये मध्ये ढवळत रहा म्हणजे खालून करपणार नाही. खूप शिजवू नका.
- तेल सुटू लागेल, गॅस बंद करावा. उर्वरित कोथिंबीर वरून टाकावी.
- भाकरी किंवा चपाती सोबत गरम सर्व्ह करावे.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.