चहा मसाल्याने चहाला छान चव आणि वास येतो. पावसाळ्यात किंवा थंडीत नेहमीचा चहा पिण्याऐवजी आल्याचा चहा प्यावासा वाटतो. आल नसेल घरात तर मसाला टाकून ती तलफ भागवता येते. हा चहा खवखवणाऱ्या घशाला आणि मरगळलेल्या मनाला आराम देतो.
साहित्य:
कृती:
जायफळ आणि सुंठी शिवाय बाकी सगळे मसाले थोडे थोडे भाजून, थंड होऊ द्यावे.
साहित्य:
- सुंठ- १/४ कप
- लवंग- २ टेबलस्पून
- काळी मिरी- १/४ कप
- दालचिनी, छोटे तुकडे करून किंवा कुटून- १/४ कप
- वेलची- १/४ कप
- जायफळ, किसुन - १ अख्ख
- सुकलेली तुळशीची पाने- १० (ऐच्छिक)
कृती:
जायफळ आणि सुंठी शिवाय बाकी सगळे मसाले थोडे थोडे भाजून, थंड होऊ द्यावे.
तुळशी पाने, सुंठ आणि जायफळ पूड त्यात घालून मिक्सर मधून काढावे.
थंड झाल्यावर हवाबंद डब्यात हा मसाला ठेवावा. अगदी वर्षभर छान टिकतो.
चहाच्या एका कपाला साधारण १/४ टीस्पून एवढा घालावा. दुधात टाकून पण छान लागतो. (चहात किंवा दुधात टाकून उकळावा.)
टीपा:
- वर दिलेल्या मसाल्याच्या पदार्थांच्या तयार मिळत असलेल्या पावडर एकत्रित करून सुद्धा झटपट मसाला करता येईल.
- सुंठीचे प्रमाण तिखटपणा किती हवाय, यावर अवलंबून आहे. प्रमाण वाढवले तरी चालेल.
- औषधी गुणधर्म वाढवायचे असतील तर २ टेबलस्पून पिंपरामुळ पूड घालावी.
- कॉफी ग्राईंडर असेल तर उत्तम. त्यात छान दळला जातो हा मसाला.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.