बीटाचे गुणधर्म जेवढे चांगले आहेत तेवढाच बीट खायला अतिशय कंटाळवाण वाटत. लहान मुल तर त्या कडे पाहायला ही तयार नसतात. मी सुद्धा कच्च बीट या पचेडीच्यायोगेच खाऊ शकते कारण खरच ही पचेडी खूपच छान लागते.  
Read this recipe in English........ click here!
साहित्य:
- बीट - १ मध्यम आकाराचे
 - दही- १ कप (किंव्हा कमी-जास्त तुमच्या आवडीप्रमाणे)
 - हिरव्या मिरच्या, बारीक चिरून - २
 - चिरलेली कोथिंबीर- २ टेबलस्पून
 - दाण्याचा कुट - १/४ कप
 - साखर- चिमुटभर
 - मीठ- चवीप्रमाणे
 
कृती:
- बीट साले काढून किसून घ्यावे.
 - एका बाउलमध्ये वरील एकत्र करावे. बीटाची कोशिंबीर (बीटाची पचेडी ) तयार………
 - पण जेवायला वेळ असेल तर दही आणि दाण्याचा कुट आधीपासून घालू नये.
 
टीपा :
- याप्रमाणे गजर, मुळा, काकडी व केळ यांची कोशिंबीर (पचेडी ) करता येते.
 - पण काकडीची पचेडी करणार असाल तर काकडी किसून घेऊ नये. काकडी कोचावी.
 - आणि अर्थातच केळ किसून न घेता त्याचे छोटे तुकडे करावेत, हि केळ्याची कोशिंबीर जास्त वेळ ठेऊ नये.
 

बिटा कोशिंबीर मध्ये उकडलेल्य बटाट्याच्या काचर्या घातल्यास चव छान येते आणि बिटाचा उग्रपणा कमी होतो
ReplyDelete