साधारणपणे मुगाचे लाडू हे नेहमीच्या (साल काढलेल्या ) डाळीच्या पीठापासून बनवले जातात. परंतु मी (खरतरं माझ्या सासूबाईंनी) इथे थोडा बदल केला आहे. सालवाली मुगाची डाळ आणि इतर साहित्य वापरून हे लाडू अधिक पौष्टीक बनवले आहेत.
हे लाडू उपवासाला पण चालतात. थंडीच्या दिवसांत भरपूर उष्मांक देतात. शिवाय गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रीयांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे लाडू आहेत.
साहित्य:
- सालवाली मुगाची डाळ- २५० ग्रॅम
- पिठीसाखर- १०० ते १२५ ग्रॅम (तुम्हांला कितपत गोड आवडत त्याप्रमाणात )
- साजूक तूप- १२५ ग्रॅम
- बदाम पूड- १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
- खारीक पूड- १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
- डिंक- २ टेबलस्पून
- काळ्या मनुका- १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
- जायफळ पूड- १/२ टीस्पून
- वेलची पूड- १ टीस्पून
कृती :
- सालवाली मुगाची डाळ खमंग गुलाबी रंगावर भाजून घ्यावी. थंड झाल्यावर मिक्सरवर दळावी.
- डिंक थोड्याश्या तूपात फुलवून (तळून ) घ्यावा. मिक्सरवर जाडसर दळून घ्यावा.
- पिठीसाखारेतील गुठळ्या मोडून, ती चाळून घ्यावी.
- एका जाड बुडाच्या भांड्यात/कढईत किंव्हा नॉन-स्टिक प्यानमध्ये गरजेप्रमाणे तूप घेऊन मुगाचे पीठ खमंग वास येईपर्यंत मध्यम ते मंद आचेवर ( जसे बेसन लाडू साठी बेसन भाजतो तसे ) भाजावे. सतत हलवावे अन्यथा खालून जळण्याची भिती असते.
- थंड झाल्यावर चवीप्रमाणे पिठीसाखर इतर सर्व पदार्थ त्यात मिसळून लाडू बांधावेत.
टीप: साखर वापरायची नसेल तर मेथीच्या लाडूला जसा आपण गुळाचा पाक करतो तसा करून भाजलेले मुगाचे पीठ व इतर सर्व साहित्य पिठीसाखर वगळून त्यात घालून लाडू वळावेत. यात तूप कमी वापरले तरी चालते.
Atishay uttam receipe. Me nakki karun baghnar ahe.
ReplyDeleteHe ladoo gul waparun kase karayache?
ReplyDeleteहे लाडू गुळ वापरून करत नाहीत. तरीपण तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर साधा गुळ वापरून मेथीच्या लाडू प्रमाणे करून पहा. चिक्कीचा गुळ वापरल्यास लाडू कडक होतील.
DeleteHe ladoo gul vaprun kartat pan mug daal n gheta akkhe mug ghyavet
Delete