आपण नेहमी पडवळाची भाजी करताना त्याच्या बीया फेकून देतो. पण दक्षिण भारतात त्यापासून चटणी बनवतात. मी त्यात थोडे बदल करून हि चटणी बनवली आहे. इडली-डोश्या बरोबर नेहमीच्या चटणीला बदल म्हणून ही चटणी चांगली वाटते.
साहित्य:
पडवळाच्या बीया आतील लगद्यसह - १/२ कप
हिरव्या मिरच्या - २ ते ३
राई - १/२ टीस्पून
जीरे - १/४ टीस्पून
मेथीदाणे - २ ते ३
हळद- १/४ टीस्पून
हिंग- चिमुटभर
तेल- १ टेबलस्पून
चिंच- एका गोटी एवढी (किंव्हा २ टीस्पून कोळ )
गूळ, चिरलेला- १ टीस्पून किंव्हा आवडीप्रमाणे
चिरलेली कोथिंबीर - २ टेबलस्पून
मीठ- चवीप्रमाणे
कृती:
एका प्यानमध्ये तेल करून राई घालावी, तडतडली की मिरच्या, जीरे, हळद, हिंग करावी. त्यात बीया व लगदा आणि मीठ टाकून मंद आचेवर ३-४ परतून घ्यावा घ्यावा. थंड होऊ द्यावा.
वरील मिश्रण, चिंचेचा कोळ, गुळ आणि कोथिंबीर घालून वाटून घ्यावा ……… चटणी तयार.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.