लग्नासारखे शुभ समारंभ असले कि मठ्ठा हा हवाच. मसालेभात, कोशिंबीर, चटणी, पापड, पुरी-भाजी, भजी, जिलेबी आणि मठ्ठा … या शिवाय बेत अपुरा आहे नाही ! मग एवढ तुडुंब जेवल्यावर ते जिरवायला मठ्ठा हा हवाच.
साहित्य:
ताक - ३ कप
आल्याचा ठेचा- १/२ टीस्पून
हिरवी मिरची, बारीक कापून किंव्हा खरडून- १ ते २
कोथिंबीर - १ टेबलस्पून
जीरे पूड- १/२ टीस्पून
मीरे पूड- १/४ टीस्पून
साखर- १ टीस्पून
सैंधव (सैंधव आणि पादेलोण एकत्र) किंव्हा साधं मीठ - चवीप्रमाणे
कृती:
सर्व एकत्र करून रवीने चांगले घुसळून घ्या. थंडगार करून मग प्या.
हल्ली खारी बुंदी टाकायची पद्धत आली आहे , छान लागते.
जिरे पूड व सैंधव च्या एवजी चाट मसाला किंव्हा जलजीरा मसाला छान चव येते.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.