झटपट होणारे आंबट-गोड, तिखट लोणचे. मोहरी आणि मेथीच्या फोडणीचा खमंगपणामुळे लोणचे मस्त चटकदार होते.
Read this recipe in English....click here.
साहित्य:
कृती:
Read this recipe in English....click here.
साहित्य:
- कैऱ्या - २ मध्यम
 - गुळ, चिरून- १/२ कप (कैरीच्या आंबटपणा नुसार गुळाचे प्रमाण कमीजास्त करावे.)
 - मेथीचे दाणे- १/२ टिस्पून
 - तेल- १ टेबलस्पून
 - मोहरी- १/४ टिस्पून
 - हिंग- १/४ टिस्पून
 - हळद- १/४ टिस्पून
 - लाल तिखट/मिरची पूड- १ टिस्पून किंवा चवीनुसार
 - मीठ - १/२ टिस्पून किंवा चवीनुसार
 - पाणी-१/२ कप
 
कृती:
- कैऱ्या धुवा आणि फडक्याने पुसून कोरड्या करा.
 - कैऱ्या सोला व बाटे/कोय काढून टाका. छोटे छोटे चौकोनी तुकडे करा.
 - पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी टाका.
 - मोहरी तडतडली की हिंग, हळद आणि मेथी दाणे घालून किंचित तपकिरी होईपर्यंत परता.
 - कैरीचे चौकोनी तुकडे आणि मिरची पावडर घाला. अगदी थोडा वेळ परता.
 - आता पाणी आणि मीठ घालावे. छान एकत्र करा.
 - झाकण ठेवून कैरीचे तुकडे मंद आचेवर शिजू द्यावे.
 - तुकडे शिजले की पॅनमध्ये कडेला करून मध्ये गूळ घाला. चमच्याने गुळ दाबून रसात मिक्स करा. आवश्यक असेल तर थोडे पाणी घालावे. (रसाचे प्रमाण आपल्या पसंतीनुसार कमीजास्त ठेवावे.)
 - चांगले मिक्स करावे आणि झाकण न ठेवता मंद आचेवर ५-६ मिनीटे शिजू द्यावे. रस पाकाप्रमाणे थोडा घट्ट आणि चिकट झाला पाहिजे. थंड झाल्यावर तो अधिक घट्ट होईल.
 - मेथांबा आता तयार आहे. चपाती किंवा पराठा बरोबर मस्त लागतो. फ्रीझमध्ये ठेवल्याने जास्त दिवस टिकेल.
 

No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.