बाजारात काजू, कैरी, करवंद यायला लागली कि समजावे उन्हाळा आला. आधी कच्ची करवंदे विकायला येतात आणि नंतर काळी गोड अशी पिकलेली करवंदे. कच्ची करवंदे चटणी आणि लोणचे बनवण्यासाठी वापरली जातात.
चला तर आज करू या चटणी .........
Read this recipe in English....click here.
साहित्य:
कृती:
टीप:
चला तर आज करू या चटणी .........
Read this recipe in English....click here.
साहित्य:
- खोवलेला ताजा नारळ - १/४ कप
- कच्ची करवंदे - १/४ कप
- हिरव्या मिरच्या- २
- लसूण पाकळ्या- २
- आले- १/४ इंच तुकडा
- चिरलेली ताजी कोथिंबीर - २ टेबलस्पून
- साखर- एक चिमूटभर
- मीठ- चवीनुसार
- पाणी- आवश्यकतेनुसार
कृती:
- गॅसवर मिरच्या थोड्याश्या भाजून घ्याव्यात. (नाही भाजल्या तरी चालतील पण भाजल्यामुळे चटणीला खमंगपणा येतो. )
- वरील सर्व साहित्य एकत्र करा आणि वाटून घ्या. (पाट्यावर वाटलेली चटणी फारच मस्त लागते.)
- चटणी तयार, काश्याबारोबारही खा………
टीप:
- चटणीला चांगली चव हवी असेल तर फ्रोझन खोबरे वापरू नका, ताजे साहित्य वापरा.
- करवंदा ऐवजी कैरी वापरून पण अशीच चटणी करता येते.
- दोन्ही फळे उन्हाळ्यात उपलब्ध असतात. पण दोन्ही चटणीची चव वेगळी लागते.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.