'वन डिश मील' म्हणजे जेवणासाठी एकच पदार्थ करायचा तर तो पूर्णान्न हवा. कर्बोदके, प्रथिने खनिजे इत्यादी गोष्टींचा समतोल असणारा हवा. मुख्यत: रात्रीच्या जेवणासाठी आपण 'वन डिश मील' चा पर्याय स्वीकारतो. त्यामुळे हा पदार्थ फारसा कटकटीचा नको. माझ्या घरात लहान मुलं असल्यामुळे पौष्टीकते बरोबर चटपटीतही हवा. रात्रीची वेळ असल्यामुळे पचण्यास हलका हवा. मसाले सुद्धा अतिशय कमी लागतात. कमी वेळात आणि कमी तेलात होणारा हा पोटभरीचा प्रकार, माझ्या घरात खूपच प्रिय आहे.
साहित्य:
कृती:
टीपा :
साहित्य:
- मुग डाळ- १ टीस्पून
- मसूर डाळ- १ टीस्पून
- चणा डाळ- १ टीस्पून
- तूर डाळ- १ टीस्पून
- उडीद डाळ- १ टीस्पून
- लसूण पाकळ्या- २
- हिरवी मिरची- ३ ते ४
- आल- १ इंच
- जिरे- १/२ टीस्पून
- बारिक चिरलेला पालक - १/२ कप
- गाजर, सोलून व किसून- १/२ कप
- उकडलेल्या मक्याचे दाणे- १/४ कप
- रोल ओटस- १/२ कप
- रवा- १/२ कप
- हिंग- १/४ टीस्पून
- हळद- १/२ टीस्पून
- दही- १/४ कप
- खाण्याचा सोडा- १/२ टीस्पून
- पाणी- अंदाजे १/२ कप (भिजवलेल्या डाळीच पाणी धरून)
- मीठ- चवीप्रमाणे
- तेल- जरुरीप्रमाणे
कृती:
- सर्व डाळी धुवून ३-४ तास भिजवाव्यात.
- सर्व डाळी, मिरच्या, आल व लसुन एकत्र वाटून घ्यावे.
- वाटलेले मिश्रण एका बाउल मध्ये काढून त्यात ओटस आणि रवा घालावा.
- दही चांगले फेटुन घ्यावे. वरील मिश्रणात दही व पाणी घालून चांगले ढवळून घ्यावे. कमीतकमी २० मिनिटे झाकून ठेवावे.
- ओटस आणि रवा पाणी शोषुन घेते, इडलीच्या पिठापेक्षा थोडेसे घट्ट. नंतर त्यात तेल वगळता सर्व साहित्य एकत्र करावे व चांगले फेटून घ्यावे.
- अप्पे पात्र गरम करून त्याच्या वाट्यात अगदी थोडे तेल घालावे किंवा स्प्रे करावे.
- त्या वाट्यात वरील मिश्रण घालावे. आच मंद-मध्यम ठेवून १-२ मिनिट झाकून ठेवावे. लक्ष्य ठेवावे.
- एक बाजू चांगली खरपूस भाजली गेली की अप्पे उलटावे. बाजूने अगदी थोडेसे तेल सोडून छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
- छान टम्म फुगतात. टोमॅटो केचप किंव्हा चटणी सोबत गरमागरम वाढावे.
टीपा :
- जर अप्पे पात्र नसेल तर या मिश्रणाचे उत्तपे करू शकता.
- हे अप्पे गरम असतानाच खावे. पारंपारिक अप्पे फारसे खरपूस भाजून घ्यावे लागत नाहीत परंतु यात ओटस असल्यामुळे खरपूस भाजून घ्यावेत, नाहीतर गिळगिळीत लागतात.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.