Wednesday, February 26, 2014

Ratalyacha kees (रताळ्याचा किस)

महाशिवरात्र जवळ आली की बाजारात मोठ्या प्रमाणात रताळी दिसू लागतात. नुसती रताळी उकडून किंव्हा भाजून खाण्यापेक्षा त्याचा कीस केला की त्याची लज्जत वाढते.   


Read this recipe in English..... click here. 

साहित्य:
  • रताळ्याचा किस- ३ कप (२ ते ३ मोठी रताळी)
  • साजूक तूप- ३ टिस्पून
  • जीरे- १ टिस्पून
  • हिरव्या मिरच्या, बारीक चिरून किंवा खरडून - ४
  • शेंगदाण्याचा कूट- १/४ कप 
  • साखर- १ टिस्पून
  • मीठ- चवीप्रमाणे 


कृती:
  • रताळी स्वच्छ धुवून, चोळून घ्यावीत. 
  • रताळ्याचा काळपट व खराब भाग काढून टाकावा. रताळी किसून घ्यावीत. साले काढायची जरुरी नाही.  
  • किसलेले रताळे पाण्यात टाकावे म्हणजे ते काळे पडणार नाही व त्याचे स्टार्च पण कमी होइल, त्यामुळे शिजल्यावर ते एकमेकांना चिकटणार नाही. 
  • पाण्यात किसलेले रताळे चोळून घेऊन चाळणीत निथळत ठेवावे.   
  • कढईत तूप गरम करावे त्यात जीरे, मिरच्या घालून फोडणी करावी. रताळ्याचा किस कढईत टाकून निट परतून घ्यावा. 
  • मंद आचेवर रताळ्याचा किस झाकण ठेवून ३ ते ५ मिनिटे शिजू द्यावा. 
  • थोड्यावेळाने तो कीस पारदर्शक दिसू लागतो तेव्हा त्यात थोडे मिठ, साखर, शेंगदाण्याचा कूट घालून परतावे. थोडावेळ झाकण ठेवून शिजू द्यावे.

रताळ्याचा किस तयार झाला दह्याबरोबर गरमागरम सर्व्ह करावा.
रताळ्याप्रमाणे याच पद्धतीने बटाट्याचा कीस पण करता येतो.