अतिशय रुचकर …………बस एवढंच वर्णन पुरेसं आहे. बाकीच आपल्या जीभेवर सोपवा.
Read this recipe in English......click here.
साहित्य:
कृती:
टिपा:
Read this recipe in English......click here.
साहित्य:
- सोललेली कोळंबी, मध्यम आकाराची- १/२ कप
- बटाटा- १ मध्यम (ऐच्छिक)
- कांदा, बारीक चिरून- १/२ कप (१ मध्यम.)
- भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण - ३ ते ४ टेबलस्पून
- आले-लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
- हळद - १/२ टिस्पून
- हिंग-१/४ टिस्पून
- दालचिनी- १ इंच
- घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- ३ ते ४ टिस्पून
- गरम मसाला - १ टिस्पून
- कोकम/ आमसुलं- ४ ते ५
- तेल- ३ टेबलस्पून
- कोथिंबीर, बारीक चिरलेली- २ टेबलस्पून
- पाणी- आवश्यकतेनुसार
- मीठ- चवीनुसार
कृती:
- कोळंबी सोलून तिचा मधला धागा काढावा. व्यवस्थित धुवून घ्यावी. तिला थोडेसे मीठ व हळद चोळून अर्धा तास मुरत ठेवावी.
- बटाटे सोलून साधारण १ इंचाचे तुकडे करावेत.
- मोठ्या पॅनमधे किंवा कढईत तेल गरम करावे. त्यात कांदा, दालचिनी घालून तपकिरी रंगावर परतावे.
- हिंग, हळद व मसाला, आले-लसुण पेस्ट आणि खोबऱ्याचे वाटण घालावे. तेल सुटेपर्यंत हा मसाला परतावा.
- त्यात कोळंबी घालून एक मिनिट परतून घ्यावी.
- पाणी, बटाटा घालून चांगले मिक्स करावे व झाकण ठेऊन मंद आचेवर ५-६ मिनीटे शिजवावे.
- तुम्हाला ज्या प्रमाणात रस्सा हवा आहे त्या प्रमाणे पाणी घालावे व गरज असल्यास मीठ घालावे. ४ ते ५ मिनिटे किंवा बटाटा शिजेपर्यंत झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवावे.
- कोकम, गरम मसाला, कोथिंबीर टाकून हलकेच ढवळा आणि झाकून ठेवा. गॅस बंद करा.
- पोळ्या किंवा भाकरी किंवा गरम भाताबरोबर सर्व्ह करा.
टिपा:
- मालवणी मसाला नसेल तर, त्याऐवजी आपण (२ टिस्पून लाल तिखट + १ टिस्पून गरम मसाला) वापरू शकता. पण अस्सल मालवणी चवीसाठी नमूद केलेला गरम मसालाच वापरा.
- कोकम ऐवजी २ टिस्पून चिंचेचा कोळ वापरू शकता.
- तुम्हाला आवडत नसेल तर बटाटा नाही घातला तरी चालेल.
- आमच्या कोकणात वांगी, कच्चा पपई, आलकोल/नवलकोल, दुधी भोपळा इ. भाज्या सुद्धा या रश्यात घातल्या जातात.
आता बनवले आहे अजुन टेस्ट केली नाही
ReplyDeleteआता बनवले आहे अजुन टेस्ट केली नाही
ReplyDelete