मोरांबा हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. यालाच 'साखरांबा' असेही म्हटले जाते. काहीजण कैरीच्या बारीक फोडी करतात पण आमच्या घरात किसलेल्या कैरीचा मोरंबा आवडतो.
साहित्य:
- कैरी - १ किलो /साधारण ४ मध्यम (२ कप किस)
- साखर- ४ कप (यापेक्षा थोडी कमी-जास्त लागू शकते. कैरीच्या आंबटपणावर अवलंबून आहे)
- वेलची पूड- १ टीस्पून
- लवंग- ६ ते ८
- मीठ- चिमुटभर
कृती:
- प्रथम कैऱ्या सोलून व किसून घ्याव्यात. कोय किंवा बाटा टाकून द्यावा.
- एका जाड बुडाच्या स्टेनलेस स्टील किंवा नॉन-स्टिक भांड्यात कीस, साखर, मीठ व लवंगा एकत्र करून ठेवावे. हे मिश्रण १ तास तसेच ठेवून द्यावे. त्यामुळे कैरीला भरपूर रस सुटतो.
- हे मिश्रण मंद ते मध्यम आचेवर ठेवून शिजवावे. लक्ष ठेवून मधून मधून ढवळत रहावे.
- साखर वितळून त्याचा पाक होऊ लागेल. पाक हळूहळू घट्ट होवू लागेल. २ तारी पाक झाला की गॅस बंद करावा. मधाप्रमाणे पाक दिसेल.
- त्यात वेलची पूड घालावी आणि छान ढवळून घ्यावे.
- गार झाल्यावर निर्जंतुक व कोरड्या बरणीत भरून ठेवावा.
- कोरड्या हवेत हा मोरंबा वर्षभर टिकतो. दमट हवामानात २ महिने बाहेर चांगला राहील पण नंतर फ्रीजमध्ये ठेवावा.
टिपा :
शक्यतो राजापुरी कैऱ्या वापराव्यात. घट्ट व मांसल असणाऱ्या या कैऱ्या लोणचे व मोरांबा बनवण्यासाठी आदर्श मानल्या जातात.
Hello Purva,
ReplyDeleteChhunda ani Murambyat Sakhare aivaji Gul {jaggery} vaparal tar praman kay ase?
sakhare etakech asave. thodese chakhun baghave karan kairichya aambatpanavar pan avalambun aahe.
Delete