पटकन होणारा, चविष्ट एवढे वर्णन पुरेसे आहे, नाही ? पंजाबी समोस्यापेक्षा खूपच खुसखुशीत होतात. वेगवेगळ्या प्रकारचे (व्हेज, नॉन-व्हेज, गोड, चीज असं काहीही) सारण वापरून आपण हे समोसे बनवू शकतो. तळलेले नको असतील तर बेकही करता येतात.
Read this recipe in English.......click here.
साहित्य:
कृती:
टिपा:
Read this recipe in English.......click here.
साहित्य:
- तयार समोसा पट्टी (Switz Frozen Samosa Patti)- 1 पॅक
- तळण्यासाठी तेल- आवश्यकतेनुसार
- बटाटे, उकडुन- 2 मोठे
- मटार, वाफवुन- 1½ कप
- हिरव्या मिरच्या - 4
- जिरे- 1 - टिस्पून
- गरम मसाला- 2 टिस्पून
- आले-लसूण पेस्ट - 2 टिस्पून
- आमचुर पावडर - ½ टिस्पून
- हळद- ½ टिस्पून
- हिंग- ¼ टिस्पून
- मीठ- चवीनुसार
- तेल- 2 टेबलस्पून
- मैदा - 2 टिस्पून
- पाणी - 2 ते 3 टेबलस्पून
कृती:
- बटाटे सोलून अगदी बारीक चीरा किंवा हातानेच चुरा.
- हिरव्या मिरच्या व जिरे आणि भरडसर वाटून घ्या.
- नॉनस्टिक कढई मध्ये तेल गरम करून त्यात मिरची-जिरे ठेचा, आले-लसूण पेस्ट, हिंग, हळद घालून फोडणी करा.
- काही सेकंद परतल्यावर त्यात बटाट्याच्या फोडी आणि मटार घालावेत. मीठ घालुन सर्व एकत्र करून परता. मंद आचेवर झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजवावे.
- नंतर त्यात गरम मसाला, आमचुर टाकून जरा वेळ परता. एक वाफ काढा.
- गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर पावभाजी मॅशर किंवा चमच्याने मिळून येण्यासाठी थोडेसे मॅश करा.
- मैदा आणि पाणी एकत्र करून घट्ट पेस्ट करा.
- समोसा पट्टी घेवून पुढील फोटोत दाखवल्याप्रमाणे समोसा तयार करा. शेवटी पेस्ट लावून चिकटवून टाका. अशाच प्रकारे सर्व समोसे करा.
- समोसे भरताना पट्ट्या आणि झालेले समोसे ओलसर कापडाने झाकून ठेवा. अन्यथा पट्ट्या आणि समोसे सुकून त्यांना तडे जातात व फुटतात.
- कढईत तेल गरम करून समोसे सोनेरी रंगावर तळून घ्या. (किंवा सामोश्याना ब्रशने थोडे तेल लावा. प्रीहीटेड ओव्हन मध्ये 200° C ला एक बाजू ८ ते १० मिनिटे व दुसरी बाजू ७-८ मिनिटे बेक करा.
- चिंच-खजूर चटणी आणि पुदिना चटणी सोबत समोसे गरम गरम सर्व्ह करावे.
टिपा:
- फ्रीझरमधल्या पट्ट्या वापर करताना समोसे करण्यापूर्वी फ्रीजमधून 20 मिनिटे अगोदर बाहेर काढा.
- उरलेल्या पट्ट्या फ्रीजर मध्ये airlock पिशवीत ठेवू शकता.
- सारण भरून समोसे तयार करून सुद्धा फ्रीजर मध्ये airlock पिशवीत ठेवू शकता. जेंव्हा हवे असतील १०-१५ मिनिटे आधी बाहेर काढून तळावे.
- मटार नसतील तर हिरवे वाटाणे भिजवून व उकडून वापरतात. हे पण खूप रुचकर लागतात.
तयार पट्टीपेक्षा घरी पट्टी कशी बनवावी हे सांगावे.
ReplyDelete