लहानपणी एक आजोबा आलेपाक विकायला आणायचे. "सर्दी-खोकला, झटकन मोकळा" अशी त्यांची खणखणीत आवाजातली साद ऐकून आम्ही पटकन बाहेर यायचो. आजही 'आलेपाक' हा शब्द ऐकला की जुनी आठवण ताजी होते.
आले हे कफनाशक, पित्तनाशक व पाचक आहे. कुठल्याही रुपात आल्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
Read this recipe in English.....click here.
साहित्य:
कृती:
आले हे कफनाशक, पित्तनाशक व पाचक आहे. कुठल्याही रुपात आल्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
Read this recipe in English.....click here.
साहित्य:
- आले, सोलून व चिरून- १ कप
- साखर- २ कप
- सायीसकट दुध- १/२ कप
- तूप- १ छोटा चमचा
कृती:
- आले अगदी थोडं पाणी वापरून गुळगुळीत मिक्सरवर वाटून घ्या.
- एका चौकोनी बर्फी ट्रे किंवा ताटाला तुपाचा हात फिरवून घ्या.
- एका जाड बुडाच्या किंवा नॉन-स्टीक पॅनमध्ये वाटलेले आले, साखर आणि दुध एकत्र करा.
- मध्यम आचेवर ठेवून सतत हलवत रहा. हळूहळू साखर वितळून घट्ट होऊ लागेल.
- लक्ष्यपूर्वक ढवळत राहा. मिश्रण भांड्याच्या कडेपासून सुटू लागेल. याचा अर्थ ते तयार आहे. गॅस बंद करा.
- मिश्रण ट्रे मध्ये ओतून गरम सुरीने चौकोनी तुकडे पाडा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या करा.
- हवाबंद डब्यात भरून ठेवा.
Aap आहे का आपले माहिती खप सुंदर देतात तुम्ही खुप खूप धन्यवाद
ReplyDelete