साहित्य:
- ताज आणि घट्ट ताक - २ कप
- आलं, चिरून - १ इंचाचा तुकडा
- हिरव्या मिरच्या- २ ते ३
- ओले खोबरे, खोवुन- २ टेबलस्पून
- साजूक तूप- १ टेबलस्पून
- जिरे- १ टीस्पून
- साखर- चिमूटभर किंवा आवडीप्रमाणे
- मीठ- चवीनुसार
कृती:
- मिरच्या, आलं आणि खोबरे शक्यतो पाणी न वापरता किंवा जरासं पाणी घेऊन वाटून घ्या.
- कढईत तूप गरम करून जिरे टाका, जिरे तडतडले की मिरची-खोबऱ्याचे वाटण घालून जरासं परता.
- त्यात ताक, मीठ व साखर घाला. मंद आचेवर कढईच्या बाजूला बुडबुडे दिसेपर्यन्त गरम करा.
- उकळू नका. सतत ढवळत रहा.
- वरीचा भात किंवा उपवासाच्या थालीपीठासोबत गरमागरम वाढा.
टीप:
- ताक उपलब्ध नसेल तर १कप दह्यात साधारण १ ते दीड कप पाणी घालून चांगलं घुसळून ताक बनवा.
- कढी घट्ट हवी असेल तर ताकाला १ चमचा शिंघाडा पीठ लावा.
- उपासाला चालत असेल तर कोथिंबीर चिरून कढीत घाला.
apratim, hya madhey kobrya evagi shegdane vaparle tar chale ka
ReplyDelete