आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या चटण्या खाल्या असतील. पण हि चटणी सुक्या जवळ्याची. मत्स्यप्रेमींची जीव्हा तृप्त करेल यात शंका नाही.
Read this recipe in English, click here.
साहित्य:
कृती:
टीप- ओल्या खोबऱ्याएवजी सुके खोबरे पण वापरता येईल. चव वेगळी लागेल थोडी.
Read this recipe in English, click here.
साहित्य:
- सुकट /सुका जवळा /सुका कोलीम /सुंगठा - १/२ कप
- खवलेले ओले खोबरे- ३ ते ४ टेबलस्पून
- चिंचेचा घट्ट कोळ- २ टीस्पून
- लसुण- ४ ते ५ पाकळ्या
- सुक्या लाल मिरच्या, तोडुन - ३ ते ५ (किंवा लाल मिरची पूड- २ टीस्पून)
- मीठ- चवीनुसार
- तेल- १ टीस्पून (ऐच्छिक)
- पाणी- अगदी जरास /चमचाभर
कृती:
- सुकट निवडून, पाखडून घ्या. (सुकट ताजी, स्वच्छ, पांढरी असावी.)
- सुकट खोलगट तव्यावर किंवा कढईत लालसर रंगावर आणि घमघमाट येईपर्यंत भाजावी चांगली चुरचुरीत भाजली गेली पाहिजे.
- वरील सर्व साहित्य आणि सुकट एकत्र करून मिक्सरला वाटून घ्यावे.
- कुठल्याही भाकरी सोबत मस्त लागते.
टीप- ओल्या खोबऱ्याएवजी सुके खोबरे पण वापरता येईल. चव वेगळी लागेल थोडी.
Pan he chatani kiti divas rahu shakate
ReplyDelete