तांदूळ निवडुन ४ दिवस भिजत घालायचे. रोज त्यातले पाणी बदलायचं. ४ दिवसांनंतर पाणी काढून चाळणीत निथळून घ्यायचे.
हे तांदूळ उन्हामध्ये पूर्ण सुकवून घ्यायचे. थोड्याश्या जीऱ्यासोबत गिरणीतून अगदी बारीक दळून आणायचे.
ज्या दिवशी कुरडया करायच्या आहेत त्यादिवशी एका मोठय़ा जाड बुडाच्या पातेल्यात पीठ घेवून त्यात मोठ्या चमच्याने हळूहळू, ढवळत-ढवळत, गुठळ्या मोडत पाणी घ्यालायचं. जवळजवळ पिठाच्या तिप्पट पाणी लागेल. इडलीच्या पिठाप्रमाणे दिसेल. ते उकळायला ठेवायचं. त्यात चवीनुसार मीठ घालायचं. सतत ढवळत रहायचं. त्याच्या गाठी होऊ द्ययच्या नाहीत की ते खाली लागू द्यायचं नाही. हा चीक चांगला रटारट शिजू द्यायचा. पण तो पापडय़ांना करतो तसा पळीवाढी शिजवायचा नाही. शिजला जॅम प्रमाणे घट्ट दिसू लागला कि झाला असा समजावे. तो शिजला की घट्ट होतो शिवाय त्याचा पांढरा रंग बदलून तो धुवट पारदर्शक होतो. आता तो गॅसवरून खाली उतरवायचा. कुरडया शक्यतो चीक गरम असतानाच करायच्या असतात. नाहीतर त्या तुटतात. प्लास्टिकच्या मोठ्या पेपरवर सोऱ्याने पटापट कुरडया पडून घ्यायच्या. २-३ सोरे आणि मदतीला माणसे असतील तर उत्तम. कडकडीत उन्हात कुरडया छान वाळवून घ्यायच्या.
आम्हा कोकण्यांना गव्हाच्या कुरडयाऐवजी तांदळाच्या कुरडयाच जास्त आवडतात.
लहानपणी शेजारपाजारचे मिळून कुरडया करायचो ती आठवण जागी झाली.
ReplyDelete