अळशी किंवा जवस हे कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करते. हृदय रोग आणि कर्करोग यापासून संरक्षण करण्यासाठी मदत करते.
Read this recipe in English.....plz click here.
साहित्य:
कृती:
टीपा :
Read this recipe in English.....plz click here.
साहित्य:
- अळशी किंवा जवस- १/२ कप
- तीळ- १/४ कप
- मिरची पूड - २ ते ३ टिस्पून
- मीठ- चवीनुसार
कृती:
- कढईत अळशी साधारण ३-४ मिनिटे मध्यम आचेवर खमंग भाजा. थोडा रंग बदलतो. ताटलीत काढून घ्या.
- मग तीळ सुद्धा छान खमंग भाजून घ्या.
- सर्व थंड झाल्यावर मिरची पूड व मीठ घालून एकत्र मिक्सरला वाटून घ्या.
- भाकरी किंवा पोळीबरोबर चटणी सर्व्ह करावी. (खाताना चटणीत थोडासा बारीक चिरलेला कांदा व थोडस तेल टाकून मिक्स करा, मस्त लागते. भाजलेल्या पापडाचा चुरा पण यात छान लागतो. )
टीपा :
- तीळ किंवा शेंगदाणे न वापरता फक्त अळशीची चटणी सुद्धा करू शकतो पण अळशी चवीला उग्र असते. तिचा उग्रपणा कमी करण्यासाठी तीळ किंवा शेंगदाणे वापरतात
- या चटणी लसणाच्या साधारण ६ ते ८ पाकळ्या वाटून घाला. खूप मस्त लागते चटणी.
- तीळांसोबत किंवा तीळांऐवजी शेंगदाणे किंवा सुके खोबरे वापरू शकता.
- या चटणी मध्ये कढीपत्ता सुद्धा चांगला लागतो. कढीपत्ता धुवा आणि सुती कपड्यावर पसरून पूर्णपणे कोरडा होवू द्या. नंतर थोड्या तेलावर कुरकुरीत तळा. अळशी सोबत वाटून घ्या.
- अळशी हि अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे रोजच्या आहारात तिला समाविष्ट करावे. मी अळशी थोडी भाजून त्याची पूड करून फ्रीजमध्ये ठेवली आहे. भाजी शिजत आली कि मी अर्धा-एक चमचा मी भाजीत घालते. दाण्याच्या कुटाप्रमाणे अळशीच्या कुटाचा वापर करता येईल.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.