आरोग्यपूर्ण व नैसर्गिक गोडवा असणाऱ्या रुचकर …… खजुराच्या वड्या !
Read this recipe in English, click here.
साहित्य:
कृती:
टिपा:
Read this recipe in English, click here.
साहित्य:
- खजूर - 500 ग्रॅम
- काजू - ¼ कप
- बदाम - ¼ कप
- अक्रोड - ¼ कप
- पिस्ता - 2 टेस्पून
- काळ्या मनुका - 2 टेस्पून
- खसखस - 1 टीस्पून
- वेलची पूड - 1 टीस्पून
- डेसिकेटेड कोकोनट (रेडीमेड सुक्या खोबऱ्याचा चुंरा) - आवश्यकतेनुंसार
- साजूक तूप - 1 टेबलस्पून
कृती:
- खजुराच्या बिया काढून त्यांचे लहान तुकडे करा आणि मिक्सरवर भरडसर वाटून घ्या.
- मनुका चिरून घ्या.
- काजू, बदाम व पिस्ता वेगवेगळे भाजून घ्या आणि अगदी बारीक तुकडे करा.
- खसखस मंद आचेवर अगदी थोडी गरम करा.
- एका जाड बुडाच्या किंवा नॉन-स्टिक भांड्यात तूप गरम करून खजूर टाकून त्याचा एकजीव गोळा होईपर्यंत परतून घ्यावा. सतत हलवावे नाहीतर खालून करपेल.
- मग त्यात भाजलेली खसखस व काजू, बदाम, पिस्ता, मनुका, वेलची पावडर घाला. मिश्रण व्यवथित मिक्स करावे आणि थोडे थंड होऊ द्यावे.
- मिश्रण कोमट असतानाच चांगले मळून घ्यावे आणि त्याचे दोन किंवा तीन भाग करावे.
- एका अॅल्युमिनियम फॉईल किंवा प्लास्टिक शीट वर डेसिकेटेड कोकोनट पसरावे.
- खजुराच्या मिश्रणाचा एक भाग घेऊन त्याला दंडगोलाकार (रोल) आकार द्या. त्याप्रमाणे इतर दोन रोलही तयार करा.
- तो रोल अॅल्युमिनियम फॉईल ठेवून घट्ट गुंडाळून घ्या. आणि रोलच्या दोन्ही टोकांना चॉकलेट टॉफी प्रमाणे पीळ द्या. प्लास्टिक शीट वापरत असाल तर रोलच्या दोन्ही टोकांना धागा बांधून घ्या.
- 4-5 तास फ्रिजमध्ये हे रोल्स ठेवा.
- चार तासानंतर वरील अॅल्युमिनियम फॉईल काढून इच्छित जाडी/रुंदी ठेवून रोलचे काप करा.
टिपा:
- सुका मेवा मिक्सरला बारीक करू नये. भरड हवा. किंवा खलबत्त्यात कुटून घ्या.
- खजुराऐवजी अंजीर वापरून पण अश्याच वड्या करता येतात.
- मोदक मोल्ड वापरून याच मिश्रणाचे खजूर मोदक बनवता येतात. तसेच प्लास्टिक शीटवर हे मिश्रण सारख्या जडित लाटून घेवून कुकीज कटरने हव्या त्या आकारात वड्या पाडता येतात.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.