फणसाचे उंबर ही कोकणातील एक पारंपरिक पाककृती आहे. पावसाळ्यात भाजीप्रमाणे ही गरम गरम उंबर खायला सुद्धा मजा येते.
साहित्य:
कृती:
टिपा:
साहित्य:
- फणसाचे गरे, आठळ्या काढुन आणि चिरून- २ कप
- गुळ- १/२ कप
- रवा- १ कप
- ओले खोबरे, खोवलेले- १/४ ते १/२ कप
- काळे किंवा पांढरे तीळ- १ टेबलस्पून
- वेलची पूड- १/४ टीस्पून
- जायफळ पूड- १/२ टीस्पून
- मीठ- चिमूटभर
- खायचा सोडा- चिमूटभर
- तळण्यासाठी तेल- जरुरीनुसार
- रवा थोडासा मंद आचेवर भाजून घ्या, त्यामुळे त्याचा कच्चटपणा निघून जाईल.
- गरे आणि गूळ मिक्सरमध्ये एकत्रित पाणी न घालता वाटून घ्या. अगदी पेस्ट झाली पाहिजे.
- ही फणसाची पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यात रवा, वेलची व जायफळ पूड, खायचा सोडा, मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
- हे मिश्रण २० ते ३० मिनिटे तसेच ठेवा. किंचित चाखून बघा, गोड पुरेसे आहे ना यासाठी. नसेल तर जरासा गूळ कुस्करून घाला.
- कढईत तेल गरम करा. तेल व्यवथित तापले की आच कमी करून मध्यम ते मंद आचेवर वरील मिश्रणाचे छोटे छोटे गोळे हाताने किंवा चमच्याने तेलात सोडा व खरपूस टाळून घ्या. (गुळामुळे गडद तपकिरी रंग येतो)
टिपा:
- या मिश्रणाचे अप्पे सुद्धा करता येतात. यासाठी मिश्रण थोडसं पाणी टाकून सैल करा व नेहमीप्रमाणे अप्पे करा.
- शक्यतो यासाठी बारीक रवा वापरु नये.
- हे उंबर गव्हाचे पीठ वापरून देखील करतात, पण ते तितकेसे खुसखुशीत लागत नाहीत.
- फणसाऐवजी पिकलेल्या केळ्याचा वापर करून देखील उंबर बनवतात.
- फणसाच्या मिश्रणात रव्याऐवजी त्यात मावेल एवढे गव्हाचे पीठ घालून पुरी प्रमाणे घट्ट कणिक मळावे व त्याच्या पुऱ्या बनवाव्या. आमच्या गावी आषाढी/दीप आमावस्येला फणसाच्या पुऱ्या व तांदळाची खीर याचा नैवेद्य देवाला दाखवतात.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.