तापाादरम्यान किंवा इतर आजारात तोंडाची चव गेली असेल तर नक्की करावी. नुसती चाटण चाटतो तशी खावी. कोकमाचा वापर केल्याने पित्त होण्याची भीती नसते.
आमसुले अर्धी वाटी (थोडा वेळ अगदी जराश्या पाण्यात भिजत ठेवावेत) , साधारण तेवढाच गूळ, एखादी हिरवी मिरची (ऐच्छीक), कोथिंबीर, आल्याचा तुकडा, साधे मीठ, पादेलोण, भाजलेल्या जिऱ्याची पूड
वरील सर्व पाण्यासकट वाटून घ्यावे. चटणी तयार