Sunday, July 28, 2013

Palak Mug Dosa (पालक मुग दलिया डोसा )

न्याहारी, मुलांच्या डब्यासाठी  छानसा आरोग्यदायी पदार्थ………  


Read this recipe in English........click here.

साहित्य:
सालवाली मुगडाळ- १/४ कप
दलिया (लापशी रवा)- १/४ कपबारीक रवा- १ टेबलस्पून
पालक, चिरून- १/४ कप
हिरवी मिरची- २ ते ३
लसुण पाकळ्या- २
जीरे- १/२ टीस्पून
साखर- १/२ टीस्पून
दही- १ टेबलस्पून
हिंग- चिमुटभर
तीळ- १ टीस्पून
खायचा सोडा - चिमुटभर
मीठ- चवीनुसार
तेल- आवश्यकतेनुसार


कृती:
मुगडाळ व दलिया धुऊन, रात्रभर किंव्हा किमान ४ तास पाण्यात वेगवेगळे भिजत घाला.
हि भिजलेली डाळ, पालकाची पाने, मिरची, लसुण, जीरे, साखर, दही आणि जरुरीनुसार पाणी एकत्र करून  मिक्सरवर वाटा. दलिया सुद्धा वाटून डाळीच्या मिश्रणात मिसळा.
त्या वाटलेल्या मिश्रणात रवा, हिंग, तीळ, सोडा आणि मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्या. ते मिश्रण १५ ते २० मिनिटांसाठी तसच ठेवा म्हणजे रवा भिजेल.
डोसा तवा गरम करून थोडेसे तेल पसरवा. त्यावर डोसे करून घ्या.
नेहमीच्या डोश्याप्रमाणे  पातळ नको. सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी भाजून घ्या.
टोमाटो केचप सोबत किंव्हा कुठल्याही आवडीच्या चटणीसोबत गरमागरम वाढा.

डाळीऐवजी अख्खे मुग वापरले तरी चालतील पण रात्रभर भिजवावे लागतील. 

Saturday, July 27, 2013

Shengadanyache Ladu (शेंगदाण्याचे लाडू )

उपवासासाठी झटपट होणारा आणि सर्वाना आवडणारा पदार्थ ………. गुळ वापरल्याने लोहाचे प्रमाण यात जास्त असते.


Read this recipe in English..........

साहित्य:
शेंगदाणे, भाजलेले आणि सोललेले - १ कप
किसलेला गुळ- १/२ कप
वेलची पूड- १/२ टीस्पून
साजूक तूप- १ टीस्पून

कृती:
शेंगदाण्याची मिक्सरवर बारीक पूड करून घ्या.
गुळाला थोडस गरम करा. उकळू नका, विरघळन्यापुरातच गरम करा. त्यात तूप, दाण्याचा कुट, वेलची पूड टाकून व्यवस्थित एकत्र करा.
थंड झाल्यावर लाडू वळा.

Wednesday, July 24, 2013

Kantolichi Bhaji (कंटोलीची भाजी)

कंटोली हि कंटूर्ली, कर्टुल, कर्टुले, काटेली, फागल इत्यादी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. हि भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. छोट्या कार्ल्यासारखी दिसणारी हि रान भाजी खूपच उपयुक्त आहे. निसर्गाने प्रत्येक मोसमात काही फळ आणि भाज्या उपलब्द्ध करून दिल्या आहेत. ज्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. म्हणून आपण सुद्धा निसर्गाचा मान राखून मोसमी फळ आणि भाज्यांचा आस्वाद घेतला पाहिजे.


Read this recipe in English............

ओळख:


साहित्य:
  • कंटोली - १ जुडी (साधारणपणे १०-१५)
  • मोड आणून सोललेले वाल-  १/४ कप
  • चिरलेला कांदा- २ कप
  • ठेचलेला लसूण पाकळ्या - ७ ते ८
  • राई/ मोहरी- १ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला - १ टीस्पून (किंव्हा मिरची पूड आणि थोडा गोडा मसाला जास्त वापरावा.)
  • गोडा मसाला- १ टीस्पून
  • खिसलेला गूळ- १/४ टीस्पून
  • मीठ चवीनुसार
  • तेल- ३ टेबलस्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर- २ टेबलस्पून
  • खवलेले ओले खोबरे- २ टेबलस्पून

कृती:
  • कंटोली उभी मध्यभागी चिरून दोन भाग घ्या. त्याच्या बिया चमच्याच्या मागच्या बाजूने काढा. 
  • नंतर चिरून घ्या. थोडं मीठ टाकून हलक्या हाताने चुरा. थोडावेळ तसेच ठेऊन द्या. म्हणजे पाणी सुटेल व ते मऊ पडतील. वाहत्या पाण्याखाली धुऊन, पिळून घ्या.
  • एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली कि लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात सोललेले वाल व थोडे पाणी टाका. झाकण ठेऊन मंद आचेवर ७-८ मिनिटे शिजू द्या.  नंतर त्यात कंटोली व मीठ टाका.  व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १० ते १५ मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत  शिजू द्या. नंतर गुळ टाकून एक वाफ काढा. वरून कोथिंबीर व ओलं खोबर पेरा.  गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.

दुसरी पद्धत :
एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली कि लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि २-३ मिरच्या कापून टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
 नंतर त्यात कंटोली व मीठ टाका.  व्यवस्थित एकत्र करून घ्या.
त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १० ते १५ मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत  शिजू द्या. वरून ओलं खोबर पेरा.  गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.

Sunday, July 21, 2013

पापलेटचे कालवण (रत्नागिरी पद्धतीचे )

माझ्या आजीचे गाव "हर्णे", रत्नागिरीतील एक समुद्र किनाऱ्यावरील निसर्गरम्य ठिकाण.  माझी आई बरचस माझ्या आजीच्या पद्धतीच जेवण बनवते. माझ्याही  जेवण करण्याच्या पद्धतीवर या दोघींची छाप पडली आहेच.
आजीच्या पद्धतीने केलेले हे कालवण मला फार आवडतं. हे कालवण मालवणी आणि गोवन करी पेक्षा वेगळ आणि करायला फारच सोप्प आहे.



Read this recipe in English .....click here.

साहित्य:
  • पापलेटचे तुकडे- ५ ते ६ (दुसरे मासे वापरले तरी चालतील जसे हलवा, घोळ, सुरमई, रावस)
  • खोवलेलं ओलं खोबर- ३/४ ते १ कप (ज्या प्रमाणात तुम्हाला रस्सा ठेवायचा आहे)
  • लसुण  पाकळ्या- ८ ते १० (कृपया या कालवणासाठी 'आले' अजिबात वापरू नये)
  • धणे - १/२ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • हिंग- १/४  टीस्पून
  • घरगुती मसाला / मालवणी मसाला / संडे मसाला - २ ते ४ टीस्पून (किंवा तुमच्या आवडीप्रमाणे)
  • कोकम पाकळ्या- ४ ते ५  किंव्हा चिंचेचा घट्ट कोळ - १ टीस्पून (पण आम्ही कोकमच वापरतो)
  • बारीक चिरलेली कोथिंबीर - २ टेबलस्पून
  • हिरव्या मिरच्या, दोन भाग करून - २ ते ३
  • मीठ चवीप्रमाणे
  • तेल- ४ टेबलस्पून
  • पाणी- आवश्यकतेनुसार

कृती:
  • एका पॅनमध्ये  स्वच्छ  धुतलेले पापलेटचे तुकडे, हळद, हिंग, मसाला, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, कोकम, मीठ आणि तेल घ्या.  सर्व मसाला एकत्र करा आणि हलक्या हाताने माश्यावर चोळा. १५  ते २० मिनिटे मसाल्यात चांगले मुरु द्या.
  • खोवलेल खोबर, लसुण, धणे आणि जरुरीनुसार पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटा. (कृपया या कालवणासाठी 'आले' अजिबात वापरू नये, खरी चव मिळणार नाही. कोकणी पद्धतीच्या कुठल्याही माश्यांच्या कालवणासाठी आले वापरत नाहीत अपवाद फक्त कोलंबी आणि खेकडे.)  
  • फ्रीझर मधले खोबरे असल्यास वाटणासाठी गरम पाणी वापरा. नाहीतर चव आणि टेक्चर बदलते. 
  • हे खोबऱ्याचे  वाटण आणि जरुरीनुसार पाणी घालावे.  (ज्या प्रमाणात तुम्हाला रस्सा ठेवायचा आहे.) व्यवस्थित एकत्र करा.
  • झाकण लाऊन मंद आचेवर १५-२० मिनिटे शिजवा.
  • जास्त शिजऊ  नका. जोरजोराने ढवळू नका. माश्याचे तुकडे मोडतात. हलक्या हाताने वाढा.
  • गरमागरम भातासोबत किंव्हा तांदळाच्या भाकरी सोबत वाढा.



Thursday, July 18, 2013

Sabudana-Variche Ghavan (साबुदाणा आणि वरीचे घावन)

उपवासासाठी उत्तम आणि पोटभरीचा पदार्थ.......... 


Read this recipe in English.......

साहित्य:
वरी तांदूळ- १ कप
साबुदाणे - १/२ कप
उकडलेला बटाटा- १ मोठा
मिरच्या - ३ ते ४
जीरे - १ टीस्पून
खवलेल ओल खोबर-२ टेबलस्पून  (ऐच्छिक )
मीठ- चवीनुसार
तेल किंव्हा साजूक तूप- जरुरीनुसार
पाणी- जरुरीनुसार

कृती:
साबुदाणे आणि वरी धूऊन  वेगवेगळे भिजत घाला. पूर्ण बुडतील एवढ पाणी त्यात ठेवा. रात्रभर किंव्हा ४-५ तास तरी भिजू द्या.
वरी, मिरच्या, जीरे आणि ओल खोबर मिक्सरवर बारीक वाटून घ्या. साबुदाणे पण बारीक वाटून घ्या. उकडलेला बटाटा सोलून, किसणीवर किसून घ्या.
वरील वरी , साबुदाणा चे वाटलेले मिश्रण आणि किसलेला बटाटा, चवीनुसार मीठ टाका. मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. डोश्याच्या पिठापेक्षा थोड घट्ट हव.
नॉन-स्टिक तवा तापऊन थोडे तेल किंव्हा तूप घालून घावन करून घ्या.
काकडीच्या किंव्हा उपवासाच्या कोणत्याही चटणीसोबत गरमागरम वाढा.

वरील मिश्रणात बटाटा घातला नाही तरी चालतो. पण मग ते घावन लगेचच खावे लागतात.  कारण नंतर ते चिवट किंव्हा कडक होतात. बटाट्यामुळे मऊ  राहतात. त्यामुळे डब्यात किंव्हा प्रवासाला सोबत नेऊ शकतो.





Wednesday, July 17, 2013

यम्मी बिस्कीट

संध्याकाळची वेळ...भूक लागलीय. घरात काही खारी बिस्किट्स आहेत. मग बनऊन टाका हा मस्त प्रकार .........  


Read this recipe in English...........
साहित्य: 
खारट बिस्किटे (Crackers or Monaco)- १० 
उकडलेला बटाटा - १ मध्यम आकाराचा 
बारीक चिरलेला लसुण - १/२  टीस्पून 
क्रीम किंव्हा दुध- १ टेबलस्पून 
मिरी पूड- १/२ टीस्पून किंव्हा आवडीप्रमाणे 
फ्रेंच मस्टर्ड सॉस - १/४ टीस्पून (ऐच्छिक )
टोमाटो - १ मध्यम आकाराचा 
सिमला मिरची- अर्धी 
चिली फ्लेक्स - आवडीप्रमाणे 
टोमाटो केचप - जरुरीनुसार 
किसलेले चीज - जरुरीनुसार 
मीठ- चवीप्रमाणे 

कृती:
उकडलेला बटाटा सोलून, किसून घ्या. त्यात क्रीम किंव्हा दूध, मिरी पूड, फ्रेंच मस्टर्ड सॉस, बारीक चिरलेला लसुण, मीठ , थोडेसे चीज घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. 

टोमाटोचा गर काढून टाका. सिमला मिरचीचा मधला पांढरा भाग आणि बिया काढून टाका. टोमाटो आणि सिमला मिरची बारीक चिरून  घ्या. 

एका प्लेट मध्ये बिस्किटे मांडा.  त्यावर बटाट्याचे मिश्रण ठेवा. त्यावर टोमाटो केचप टाका. त्यावर बारीक चिरलेले टोमाटो आणि शिमला मिरचीचे तुकडे टाका. त्यावर किसलेले चीज पसरवा. वरून मिरी पूड आणि चिली फ्लेक्स पसरवा. 
आणि सर्व्ह करा. 




Monday, July 15, 2013

Thalipeeth (थालीपीठ)

थालीपीठ हा पदार्थ परिपूर्ण आहार आहे. मराठी माणसास त्याविषयी अधिक सांगणे न लगे. मी हा आपला पारंपारिक पदार्थ अधिक पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे.




Read this recipe in English..........

साहित्य:
भाजणी - १ कप
कापलेला कांदा- १ कप (१ मोठा)
मिरची पूड किंव्हा घरगुती मसाला - १ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
तीळ - १ टेबलस्पून
बारीक चिरलेली कोथिम्बिर- १/४ कप (किंव्हा आवडीप्रमाणे)
मीठ चवीप्रमाणे
तेल- आवश्यकतेनुसार
पाणी- १/४ कप

कृती:
एका परातीत कांदा, कोथिम्बिर, मिरची पूड, हळद, हिंग, तीळ व मीठ एकत्र करावे व हाताने हलकेसे चुरून घ्यावे.
त्यात भाजणी आणि पाणी टाकून मळून  घ्यावे. त्याचे ४ समान भाग करावेत.
एक स्वच्छ कपडा ओला करून घ्यावा. तो पोळपाटावर पसरून त्यावर गोल ठेऊन थापून घ्यावा. तेल सोडण्यासाठी भोक पडवीत. कपड्यासकट उचलून तेल लावलेल्या गरम तव्यावर टाकावा. शक्यतो नॉन-स्टीक तव वापरावा, तेल कमी लागत.
किंव्हा थंड तव्यावर थापून, तेल सोडून तवा ग्यासवर ठेवावा. भोकामध्ये व बाजूनी तेल सोडून थालीपीठ खमंग भाजून घ्यावे.
घराच्या लोण्यासोबत गरमागरम थालीपीठाची मजा काही न्यारीच असते.
मस्त घट्ट दही किंव्हा टोमाटो केचप सोबत वाढा.



Sunday, July 7, 2013

भाजणी (थालीपीठाची)

भाजणी हा मराठी खाद्यसंस्कृतीमधील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि विशेष गुणसंपन्न मूळ पदार्थ आहे. भाजणी घरात असेल तर घाईच्या किंवा अडचणीच्या वेळी केव्हाही पटकन खाण्याची सोय करता येते.

भाजणीचा उपयोग करून अनेक वैशिष्ट्यपूर्ण, चविष्ट व खमंग पदार्थ करता येतात. आपण नंतर ते पाहणारच आहोत.

पौष्टीकपणा हा भाजणीचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. धान्ये व कडधान्ये भाजून घेतल्याने भाजणी पचनास हलकी असते.

जितकी जास्त प्रकारची धान्ये व कडधान्ये आपण वापरू त्या प्रमाणत एकेका धान्य-कडधान्यातील घटक पदार्थांच्या कमतरतेची भरपाई होते.



माझी भाजणी करण्याची पद्दत :
मी भाजणीची पौष्टिकता वाढवण्यासाठी काही जास्तीचे पदार्थ त्यात टाकले आहेत.
त्याचप्रमाणे मी पारंपारिक भाजणीची कृती सुद्धा दिली आहे.

साहित्य:
  • तांदूळ (जाडा, भाकरीचा)- १ किलो
  • चणा डाळ - १/४ किलो
  • मुग डाळ किंव्हा अख्खे मुग- १०० ग्रॅम
  • उडीद डाळ किंव्हा अख्खे उडीद - १०० ग्रॅम
  • सोयाबीन - १०० ग्रॅम
  • गहू- १०० ग्रॅम
  • ज्वारी- १०० ग्रॅम
  • बाजरी- १०० ग्रॅम
  • नाचणी- १०० ग्रॅम
  • कुळीथ (हुलगे)- ५० ग्रॅम
  • मका (धान्य स्वरूपातील)- ५० ग्रॅम
  • जिरे - ५० ग्रॅम
  • धणे- ५० ग्रॅम
  • मेथी दाणे- १/२ टीस्पून (ऐच्छिक)

कृती:
सर्व धान्य-कडधान्य व जिरे, धणे एक एक करून, न करपवता लक्ष्यपूर्वक खमंग भाजून घ्या.
सर्व एकत्र करा आणि थंड होऊ द्या. गिरणीतून सरसरीत दळून आणा. कोरड्या जागी हवाबंद डब्यात ठेवा.
२-३ महिने हि भाजणी चांगली राहते.

पारंपारिक पद्धत (कोकणी):
  • तांदूळ (जाडा, भाकरीचा)- १ किलो
  • चणा डाळ - १/२ किलो
  • उडीद डाळ किंव्हा अख्खे उडीद - १/४ किलो
  • गहू- १/४ किलो
  • ज्वारी- १/४ किलो
  • जिरे - ५० ग्रॅम
  • धणे-१०० ग्रॅम

पारंपारिक पद्धत (इतर):
  • बाजरी- १ किलो
  • तांदूळ (जाडा, भाकरीचा)- १/२ किलो
  • ज्वारी- १/२ किलो
  • गहू- १/२ किलो
  • चणा डाळ - १/२ किलो
  • उडीद डाळ किंव्हा अख्खे उडीद - १/४ किलो
  • धणे- १/४ किलो

भाजणी घरात नसेल तर आयत्यावेळी जी पीठे घरात उपलब्ध असतील ती पीठे खमंग भाजून घरून त्याची सुद्धा थालीपीठे बनवता येतात.

Friday, July 5, 2013

Mirachi Vada (मिरची वडा)

ज्या लोकांना चमचमीत आवडत त्यांच्यासाठी  "मिरची वडा" हा  लोकप्रिय राजस्थानी प्रकार एक उत्तम पर्याय आहे.


Read this recipe in English........

साहित्य:
लांब व जाड्या मिरच्या- १० ते १२
तेल- तळण्यासाठी

सारण-
उकडलेले बटाटे, सोलून व किसून- १ कप
जिरे पूड- १/२ टीस्पून
धणे पूड- १/२ टीस्पून
मिरची पूड- १/४ टीस्पून (ऐच्छिक)
आमचूर- १/४ टीस्पून
मीठ चवीनुसार 

आवरण-
बेसन- १/२ कप
हळद- १/२ टीस्पून
हिंग-१/४ टीस्पून
मिरची पूड- १/४ टीस्पून
खायचा सोडा- १ चिमुटभर
मीठ चवीनुसार
पाणी- अंदाजे १/४ कप

कृती:
मिरचीला देठापासून खाली उभी चीर द्या. सारणासाठी दिलेले सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्या.

आवरण बनवण्यासाठी पाणी सोडून सर्व साहित्य एकत्र करा व त्यात पाणी हळूहळू टाकून छान ढवळून घ्या. गुठळ्या मोडून घ्या.

बटाट्याचे सारण मिरचीत भरा. मिरची बेसनच्या मिश्रणात सर्व बाजूनी बुडउन वडे तळून घ्यावे.
चिंचेच्या  चटणीसोबत गरमागरम वाढाव्यात.

या भजीसाठी भावनगरी मिरच्या वापरू नये, अस माझ मत आहे. कारण भावनगरीची साल जाड असते, त्यामुळे तळल्यावर ती कच्ची राहते. जास्त वेळ तळला तर वडा करपतो.
दुसऱ्या लांब-जाड मिरच्या बाजारात येतात, त्या मी इथे वापरल्या आहेत. त्या थोड्या तिखट असतात. त्यामुळे सारणात लाल तिखट घातले नाही तरी चालेल. 

Thursday, July 4, 2013

Chinch-Khajur Chutney (चिंच - खजुराची चटणी)

हि आंबट- गोड चटणी सगळ्या चाट पदार्थांसाठी आवश्यक आहे. ती पाणीपुरी, भेळपुरी इत्यादी पदार्थात रंगत आणते. शिवाय भजी , सामोसा या सारख्या तळलेल्या पदार्थांची लज्जत वाढवते.




Read this recipe in English.........click here.

साहित्य:
खजूर, बिया काढून- १० ते १२
चिंच, बिया आणि दोरे काढून - १/४ कप
गुळ - १ कप
मिरची पूड- १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
मीठ - चवीप्रमाणे
पाणी -४ कप

कृती:
एका स्टीलच्या, जाड  बुडाच्या भांड्यात वरील सर्व साहित्य मंद आचेवर २० मिनिटे उकळावं . थंड झाल्यावर मिक्सरमध्ये गुळगुळीत वाटून घ्यावं. गरज असल्यास चाळणीने गळून फ्रीज मध्ये ठेवा. फ्रिझरमध्ये अशी  चटणी ६ महिने टिकू शकते.
चटणी पातळ हवी असल्यास थोडी घट्ट चटणी बाउलमध्ये काढून त्यात जरुरीप्रमाणे थोडे पाणी आणि चवीप्रमाणे मीठ टाकून पातळ करावी. (पाणी घातलेली फार टिकणार नाही.)

ही चटणी उपवासाला पण चालेल, फक्त त्यात हिंग टाकू नका. 

Monday, July 1, 2013

ओव्याच्या पानाची भजी

ओवा हा पचनासाठी फारच उपयुक्त असतो. ही भजी खूपच छान लागते.


Read this recipe in English.............

साहित्य :
ओव्याची पाने- १०  ते १२
बेसन- १/२ कप
तांदुळाचे पीठ- १ टीस्पून
जिरे पूड- १/२ टीस्पून
धणे पूड- १/२ टीस्पून
मिरची पूड- १/२ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
खायचा सोडा- १ चिमुटभर
मीठ चवीनुसार
पाणी - अंदाजे ३ टेबलस्पून
तेल- तळण्यासाठी आवश्यकतेनुसार

कृती :
ओव्याची पाने स्वच्छ धुऊन व पुसून घ्यावीत. देठ काढून टाकावेत.


एका बाउलमध्ये बेसन, तांदुळाचे पीठ, वरील सर्व मसाला पूड , मीठ एकत्र करवे. पाणी जरुरीनुसार हळू हळू टाकावे. सर्व गुठळ्या मोडून घ्याव्यात.
एक एक पान  मिश्रणात बुडउन भज्या तळून घ्याव्यात.
कुठल्याही चटणीसोबत किंव्हा नुसत्या आमटी-भातासोबत गरमागरम वाढाव्यात.